HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई राजकारण

धारावीमध्ये RSS स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घातला,चंद्रकांत पाटलांचा दावा…

मुंबई| आशियातील  सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमधील झोपडपट्टीत कोरोनावर नियंत्रण मिळवल्याबद्दल WHO ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. त्यानंतर आता धारावीमध्ये कोरोना कोणामुळे नियंत्रित झाला याबद्दलच्या श्रेयवादाला सुरूवात झाली आहे. धारावीत आरएसएसच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरात जाऊन स्क्रिनिंग केलं. सगळं श्रेय सरकारने घेण्याचं काही कारण नाही. तर कोरोना विरुद्ध लढाई करताना सरकारने भ्रष्टाचार केला, असं म्हणतं चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर आरोप केले आहेत.

याआधी भाजप आमदार नितेश राणे यांनीसुद्दा धारावीतील कोरोना रुग्णसंख्या ही महाराष्ट्र सरकारमुळे नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि अन्य संस्थांच्या कामामुळे नियंत्रणात आली, असा दावा केला होता. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनीसुद्धा तसाचं दावा केला आहे. भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी ‘धारावी’ कोरोनाचा केंद्रबिंदू ठरली. पण या धारावीने कोरोनावर मात केली आहे. पण याचं श्रेय सरकारचं नसून राष्ट्रीय स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून केलेल्या स्क्रिनिंगचं आहे असं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

Related posts

भूसुरुंग स्फोटानंतर नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत बॅनर लावून दिली सरकारला धमकी

News Desk

सरकारच्या नियोजनशुन्यतेमुळेच तुर उत्पादक शेतकर्‍यांचे हाल – मुंडे

News Desk

महागाई विरोधात काँग्रेसची १० सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक

News Desk