HW News Marathi
महाराष्ट्र

किती दिवस मुस्कटदाबी आणि हुकूमशाही सहन करणार !

मुंबई | महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर आज (२७ सप्टेंबर) दुपारी २ वाजता पवार ईडीच्या मुंबईतील कार्यालयात जाणार आहे. “किती दिवस मुस्कटदाबी आणि हुकूमशाही सहन करणार, जणता एक दिवस यांना त्यांची जागा दाखवेल, अशा कठोर शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भाजपवर टीका केली आहे.

चाकणकर पुढे म्हणाल्या की, “निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षात भाजप सरकार काय झोपले होते का?, असा सवाल उपस्थित केले असून पवारांना युवकांचा मिळणार प्रतिसाद पाहता सरकार घाबरले आहे. कायदा-सुव्यवस्था राखून लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करणार आहे. त्यामुळे आमच्या आंदोलनाने कोणालाही त्रास होणार नाही.”

या घोटाळ्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह ७० जणांवर ईडीने या बँकेतील संचालक मंडळाने आणि कर्ज मंजुरी समितीने अनेक सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्यांचे संचालकांचे हितसंबंध असलेल्या कंपन्यांना नियमबाह्यरित्या कर्ज वाटप केल्याचा आरोप या नेत्यांवर ठेवण्यात आला आहे. पवारांच्या कारवाई विरोधात ईडी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. मात्र, पोलीसांनी वेळीच खबरदारी घेत ईडी कार्यालयाबाहेर कलम १४४ ( जमावबंदी ) लागू केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लातूर-सीएसटी एक्सप्रेस ट्रेनच्या इंजिनमध्ये बिघाड

Aprna

इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत त्वरीत नोंदणी सूट मर्यादेस मुदतवाढ

Aprna

नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर ४ जण जखमी

News Desk