HW News Marathi
Covid-19

घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा, रुपाली चाकणकरांनी केंद्राला डिवचलं

पुणे | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही केंद्र सरकारवर व्हॅक्सिनवरून टीका केली आहे. घरात नाही दाणा अन् मला व्हॅक्सिन गुरु म्हणा, अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केली आहे.

रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत ही टीका केली आहे. त्यांनी पोस्टबरोबर एक व्हिडीओही शेअर केला आहे. घरात नाही दाणा, पण मला “व्हॅक्सिन गुरू” म्हणा. भारतीय नागरिकांना लसीकरणापासून वंचित ठेवून केंद्र सरकारने जगभरात या लसी फुकट वाटल्या. केंद्र सरकारच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागत आहे. या पापाचं प्रायश्चित्त भाजपला करावंच लागेल, असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे.

 

किती लोकांना अटक करणार मोदीजी?

मोदीजी, आमच्या मुलांच्या हक्काची लस विदेशात का पाठवली? अशी पोस्टर्स काही लोकांनी लावली आहेत. तर भाजपचे काही लोक लहान मुलांची लस तयारच झाली नसल्याचे बोलत आहेत. सारे भारतीय भारतमातेची लेकरं आहेत. लस विदेशात पाठवली तर प्रश्न लोकं विचारणारच ना? परंतु केंद्रसरकार प्रश्न विचारणाऱ्या लोकांना गुन्हा दाखल करtन अटक करत आहे. संपूर्ण देश प्रश्न विचारतोय… किती लोकांना अटक करणार मोदीजी?, असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ५ हजार ५०५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

मंत्र्यांनो हवेत गोळीबार नको, आता जमिनीवर या !

News Desk

गरीब, कष्टकरी व मजूरांचा घरी जाण्याचा रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस करणार

News Desk