HW News Marathi
महाराष्ट्र

अॅड. गुणरत्न सदावर्तेंना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई | एस. टी. कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदावर्तेंना अजून दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.  गिरगाव न्यायालयाने सदावर्तेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवसस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत हल्ला केला होता. यावेळी पवारांच्या घरावर पोलीस बंदोबस्त नव्हता. याचाच फायदा कर्मचाऱ्यांनी घेतला. या प्रकरणी पोलिसांना आतापर्यंत १०९ जणांवर गुन्हे दाखल केले असून त्या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी पवारांविरोधात घोषणाबाजी दिली.

दरम्यान, सदावर्तेंच्या घरी काल (१० मार्च) मुंबई पोलिसांचे एक पथक दाखल झाले होते. यावेळी पोलिसांनी त्यांच्या घराची झाडा झडती घेतली असून पोलिसांनी सदावर्तेंच्या इमारतीचे सीसीटीव्ही, रजिस्टर तपासण्यासाठी ताब्यात घेतले आहे. जेणे करून सदावर्तेंना कोण-कोण भेटले. यासंदर्भातील माहिती घेण्यात तपासणार आहेत.  

गुणरत्न सदावर्ते यांच्या चिथावणीखोर भाषणानंतर एसटी कर्मचारी आक्रमक झाले, असा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे शुक्रवारी (८ एप्रिल) रात्रीच मुंबईतील गावदेवी पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतले होते. मध्यरात्री तब्बल ४ तास त्यांची मेडिकल तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर ज्या १०९ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांना सुद्धा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्या १०९ आंदोलकांसह पोलीस कोर्टाकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, सदावर्तेंना पोलिसांनी अटक केले असून मात्र, त्यांना कोणतीही नोटीस न देता घरातून नेलं असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच माझी हत्या होऊ शकते, असा खळबळजनक दावा त्यांनी केला असून त्यांच्या हत्येसाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जबाबदार असतील, असे वक्तव्य सदावर्तेंनी त्यांना अटक केल्यानंतर होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर यांच्या एकत्र पुतळ्याने शहराच्या वैभवात वाढ! – दत्तात्रय भरणे

Aprna

प्रसाद लाड यांचे पोलिसांविरुद्ध उपोषण

swarit

सुशांतसिंह ड्रग्ज प्रकरणी एनसीबी ३० हजार पानांचं आरोपपत्र दाखल करणार, रिया चक्रवर्तीचंही त्यात नाव

News Desk