HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार माझ्या हृदयात, तर बाळासाहेब-उद्धव यांची ताकत माझ्या शरीरात !

मुंबई | सचिन अहिर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आज (२५ जुलै) उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. “शरद पवार हे माझ्या हृदयात आहे तर बाळासाहेब आणि उद्धव यांची ताकत माझ्या शरीरात असल्याचे सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पत्रकाराशी बोलताना म्हणाले आहे.” पुढे असे देखील म्हणाले की, “बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया अहिर यांनी दिली आहे. पक्ष देईल ती जबाबदारी स्वकारण्यास तयार असल्याचे अहिर यांनी म्हटले आहे.”

शिवसेनेत चांगली लोके येतायत, त्यांना येऊ तर द्या, असे उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. राजकारण राजकारणासारखे करायला पाहिजे, नितीमत्ता सोडून मी काही करणार नाही. पक्ष वाढवण्यासाठी मला जे काही करता येईल ते मी करणार असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

 

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

उद्धव ठाकरे

  • पक्ष वाढवण्यासाठी मला जे काही करता येईल ते मी करणार- उद्धव ठाकरे
  • राजकारण राजकारणासारखं करायला पाहिजे, नितीमत्ता सोडून मी काही करणार नाही- उद्धव ठाकरे
  • शिवसेनेत चांगली लोके येतायत, त्यांना येऊ तर द्या- उद्धव ठाकरे
  • मराठी माणूस आणि हिंदूंची ताकद वाढते आहे- उद्धव ठाकरे
  • राजकारण करताना वृत्ती बाळगावी लागते- उद्धव ठाकरे
  • पक्ष फोडणं ही शिवसेनेची वृत्ती नाही- उद्धव ठाकरे

सचिन अहिर

  • आम्हाला पक्ष फोडायचा नाहीये, तर शिवसेना वाढवायची आहे- अहिर
  • शिवसेना वाढवण्याचे काम मी करेन- सचिन अहिर
  • दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणारा मी कार्यकर्ता आहे- अहिर
  • राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात-अहिर
  • ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जर मला संधी मिळत असेल तर ती संधी स्वीकारली पाहिजे-अहिर
  • आदित्य ठाकरे यांच्याकडे विकासाची स्वप्ने आहेत- अहिर
  • निर्णय कठीण होता अशक्य नाही- अहिर

आदित्य ठाकरे

  • सचिन अहीर चांगले नेते आहे-
  • आमची स्वप्ने एक आहेत- आदित्य ठाकरे
  • बुधवारी रात्रीपासून अहिर यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाची चर्चा सुरू झाली होती
  • शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले अहीर यांचे शिवसेनेत स्वागत
  • माजी गृहनिर्माण राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाघिची गुरु शिष्याची जयंती राष्ट्रीय एकात्मेतेचं प्रतीक

News Desk

शरद पवार पुन्हा रुग्णालयात, महिनाभरात ३ शस्त्रक्रिया

News Desk

भाजप नेते सुनील यादव आणि राम कदम यांच्या समर्थकांचा मनसेत प्रवेश

News Desk