HW News Marathi
महाराष्ट्र

सचिन अंदुरेच्या सीबीआय कोठडीत दोन दिवसांची वाढ

पुणे | डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सचिन अंदुरेच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांची एकत्रित चौकशी करायची असल्याने सीबीआय कोठडी वाढवून देण्याची मागणी सीबीआयच्या वतीने करण्यात आली. अखेर न्यायालयाने ही मागणी मान्य करत सचिन अंदुरेची कोठडी १ सप्टेंबरपर्यंत वाढवली.

दुसरीकडे शरद कळसकरचा ताबा ३ सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र एटीएसकडे आहे. त्याचा ताबा सीबीआयकडे देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्याने, आता सीबीआय सचिन अंदुरेला घेऊन मुंबईला महाराष्ट्र एटीएएसच्या कोठडीत असलेल्या कळसकरकडे जाणार आहे. तिथे दोघांना एकमेकांसमोर बसवून चौकशी करण्यात येणार आहे.

गुरुवारी अंदुरेला सीबीआयने पुणे न्यायालयात हजर केले. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांची एकत्रित चौकशी करणे गरजेचे असल्याने कोठडी वाढवून देण्याची आवश्यकता आहे, असा युक्तिवाद सीबीआयच्या वतीने करण्यात आला. अखेर न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर सचिन अंदुरेच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. सचिन अंदुरेला १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवले जाणार आहे.

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील तीन आरोपींचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात अर्ज करण्यात आला आहे. या हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरेच्या संपर्कात होते. त्याचप्रमाणे सचिनच्या मेहुण्याकडे सापडलेल्या पिस्तुलातूनच लंकेश यांची हत्या केल्याचे समोर आले आहे, अशी माहितीही सीबीआयने न्यायालयात दिली. त्यामुळे सचिन अंदुरेची पोलीस कोठडी वाढवून द्यावी, असा युक्तिवाद सीबीआयच्या वतीने करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा! – जयंत पाटील

Aprna

राजीव सातव यांच्या रिक्त जागेवर काँग्रेसमधून कोणाची वर्णी लागणार?

News Desk

“मुकेश भैय्या-नीता भाभी, हा तर एक ट्रेलर…” अंबानींच्या ‘अँटिलिया’ बाहेर सापडलेल्या कारमधून मिळाले पत्र

News Desk
देश / विदेश

अखेर अनिल अंबानींनी राफेल करारावरील मौन सोडले

Gauri Tilekar

मुंबई | राफेल करारावरून राजकारण आधीच तापलेले असताना उद्योगपती अनिल अंबानी यांनी देखील या विषयावरील मौन अखेर सोडले आहे. मी स्वतः राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसने राफेल करारासंदर्भात दिलेली माहिती ही दिशाभूल करणारी आणि चुकीची असल्याचेही उद्योगपती अनिल अंबानी यांनी म्हटले आहे. ‘शेवटी विजय हा सत्याचाच होतो’, या शब्दात अनिल अंबानी याविषयावर आपले मत व्यक्त झाले.

राफेल विमान खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वारंवार केला आहे. काँग्रेसच्या काळात एका विमानाची किंमत ५२० कोटी रुपये होती. जी या नवीन करारात १६०० कोटी रुपये झाल्याचा आरोप करीत याचे लाभ अनिल अंबानींना देखील पोहोचविण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. राफेल विमान खरेदी करारात अनिल अंबानी यांची कंपनी पार्टनर आहे.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांवर भाष्य केले. राहुल गांधींची राफेल विमानाच्या किंमती संदर्भातील सर्व वक्तव्ये खोटी असल्याचे म्हटले. त्याचप्रमाणे राफेल करारावरून राहुल गांधींनी सुरु केलेला वाद हा अत्यंत बाळबोध आहे आणि ह्यावरूनच त्यांची समजून घेण्याची क्षमता किती कमी आहे हे लक्षात येते, या शब्दात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

Related posts

गुजरातमध्ये पतंगाच्या मांज्यामुळे गळा कापला जाऊन ६ जणांचा मृत्यू

News Desk

राहुल गांधींना मौजमजेसाठी काश्मीरला जायचे असेल तर आम्ही व्यवस्था करतो !

News Desk

काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या युवासेना कार्यकर्त्यांची हकालपट्टी

News Desk