HW News Marathi
महाराष्ट्र

“फडणवीस २ आरोपींना पाठीशी घालत आहेत,” कॉंग्रेसचा गंभीर आरोप

मुंबई | राज्यात सध्या सचिन वाझे प्रकरणावरुन राजकारण चांगलंच रंगलं आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सीडीआर (कॉल रेकॉर्ड डिटेल्स) च्या आधारे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर आरोप केले होते. यावरुनच काँग्रेसनं फडणवीसांवर हल्ला चढवला आहे. दरम्यान, एकीकडे भाजपचं आरोपसत्र सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकांचंही सत्र सुरुच आहे. आज (१७ मार्च) महाविकासआघाडीची महत्वाची बैठक होणार आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत सावंत यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या १५ मार्चच्या निर्णयाने आरोपीची खासगी माहिती तिसऱ्या व्यक्तीला देणाऱ्या अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल. देवेंद्र फडणवीस यांनी मिळालेल्या सीडीआरचा स्त्रोत न सांगून व सीडीआर स्वतःकडे ठेवून ते २ आरोपींना पाठिशी घालत आहेत. त्यांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये ही विनंती, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. तसंच, एका बातमीचं कात्रणही त्यांनी ट्वीट केलं आहे.

दरम्यान, याआधीही सचिन सावंत यांनी सीडीआरवरुन फडणवीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. ‘देवेंद्र फडणवीस यांनी CDR ची माहिती तपास यंत्रणांकडे द्यावी व गुन्हेगारांना शिक्षा करण्यास मदत करावी. नागरिक म्हणूनही तपास यंत्रणांना स्त्रोत सांगणं त्यांचं कर्तव्य आहे,’ असं सावंत यांनी म्हटलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ST कर्मचारी कामावर रुजू झाले तर कारवाई होणार नाही! – अनिल परब

Aprna

शेतकऱ्यांना पैसा नको न्याय हवा, सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यावरुन प्रीतम मुंडेंनी त्यांचा घेतला समाचार 

News Desk

राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या, दरेकरांचा गृहमंत्र्यांना सल्ला

News Desk