मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. शिवाय, सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध कऱणाऱ्यांना अंदमानमध्ये सावरकरांनी शिक्षा भोगलेल्या ठिकाणी दोन दिवस पाठवायला हवं, असं मोठं विधान राऊतांनी केलंय. तरी, या मुद्द्यावरुन शिवसेना आणि राऊत पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. महाविकासआघाडीतील सहकारी पक्ष असणाऱ्या काँग्रेसची भूमिका ही कायम सावरकर विरोधी राहिली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काय आहे नेमकं ट्विट –
” काळ्यापाण्याची शिक्षा भोगणारे १९०९-२१ या कालावधीत १४९, २२- ३१ काळात ३० व ३२ ते १९३८ काळात ३८६ लोक होते. यामध्ये योगेश शुक्लासारख्या अनेकांनी शिक्षा भोगून गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस चळवळीत भाग घेतला. माफी न मागता अभिमानाने शिक्षा भोगणाऱ्या सर्वांना भारतरत्न द्यावे लागेल. काळ्यापाण्याची शिक्षा भोगलेल्या या सर्वांनी ब्रिटिशांना साथ दिली नाही. ब्रिटिशांकडून मानधनही घेतले नाही. सावरकर समर्थकांनी अंदमान जेल जाऊन नुसते पाहिले तर माफी न मागणाऱ्या व प्राणांची आहुती देणाऱ्या या अनेक महान सुपुत्रांच्या त्यागाचे महत्व कळेल. १९११ च्या आधीचे सावरकर वेगळे होते. “
काळ्यापाण्याची शिक्षा भोगलेल्या या सर्वांनी ब्रिटिशांना साथ दिली नाही. ब्रिटिशांकडून मानधनही घेतले नाही. सावरकर समर्थकांनी अंदमान जेल जाऊन नुसते पाहिले तर माफी न मागणाऱ्या व प्राणांची आहुती देणाऱ्या या अनेक महान सुपुत्रांच्या त्यागाचे महत्व कळेल. १९११ च्या आधीचे सावरकर वेगळे होते
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 18, 2020
माफी न मागता अभिमानाने शिक्षा भोगणाऱ्या सर्वांना भारतरत्न द्यावं लागेल, असं ट्विट काँग्रेस प्रवक्ते संचिन सावंत यांनी केलं आहे. सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध करणाऱ्यांना शिक्षा द्या, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. योगेश शुक्लासारख्या अनेकांनी काळ्यापाण्याची शिक्षा भोगून गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस चळवळीत भाग घेतल्याचं सांगत या सर्वांना भारतरत्न द्याव लागेल, अशी भूमिका सावंत यांनी ट्विटद्वारे मांडली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.