HW News Marathi
महाराष्ट्र

खंडणी प्रकरणी सचिन वाझेला दिलासा नाहीच, १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई। खंडणी प्रकरणी मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना न्यायालयाने १३ नोव्हें. पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी वाझेंला न्यायालयाकडून ६ नोव्हें. पर्यंत गुन्हे शाखेची कोठडी सुनावण्यात आली होती.सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार गुन्हे गुप्तवार्ता विभागात कार्यरत असताना सचिन वाझेंनी तपास सुरू केलेली बहुसंख्य प्रकरणे संशयास्पद असल्याचे पोलीस विभागाच्या अंतर्गत तपासणीत निष्पन्न झाले आहे. अशा सुमारे २५ प्रकरणांचा तपास बंद करण्यात आला आहे. ‘सीआययू’चे प्रभारी असताना वाझे तपास करत असलेले १५ गुन्ह्योही इतर विभागांकडे वर्ग करण्यात आले आहेत.

सचिन वाझेंवर व्यापारी मनसुख हिरेनच्या हत्येचा कट

दरम्यान, तळोजा कारागृहातून तात्पुरती बदली करून नजरकैदेत राहण्यासाठी वाझेंनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु वाझेंना नजरकैदेत ठेवण्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने विरोध केला आहे. वाझे हा नजकैदेत ठेवल्यास पळून जाऊ शकतो आणि खटल्यातील साक्षीदारांसदर्भात छेडछाड करू शकतो, अशी भीती एनआयएने कोर्टात व्यक्त केली आहे. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात एनआयएने म्हटले होते की सचिन वाझेंवर व्यापारी मनसुख हिरेनच्या हत्येचा कट आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्यासह गंभीर गुन्ह्यांचा आरोप आहे, त्यामुळे त्यांना नजरकैदेत राहण्याची परवानगी देण्यात येऊ नये.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी

News Desk

एकदा उघडलेल्या शाळा बंद होऊ नये या निर्धाराने सुरुवात करु, मुख्यमंत्र्यांचे शिक्षकांना आवाहन

News Desk

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला त्यापूर्वीची वाझेंची हालचाल CCTV त कैद

News Desk