HW News Marathi
महाराष्ट्र

सदाभाऊंचे मंत्रिपद कायम

मुंबई – स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतरही राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आलेली नाही. कारण त्यांचे राज्यमंत्रिपद कायम राहणार आहे. खोत हे विधान परिषदेवर भाजपचेच सदस्य असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्यात वाद सुरू झाला होता. त्यात खोत यांना भाजपने विधान परिषदेवर पाठविले. तसेच त्यांना राज्यमंत्रीही केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढविण्यात शेट्टी यांच्याइतकीच खोत यांचीही मेहनत आहे. परंतु खोत यांच्या चौकशीसाठी शेट्टी यांनी पक्षाच्या नेत्यांची समिती नेमली. खोत यांनी पक्षविरोधी काम केलेले आहे, असा ठपका ठेवून त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनाही आहे. संघटनेला एक राज्यमंत्रिपद दिलेले आहे. खोत यांना पक्षातून काढल्यामुळे त्यांनी राज्यमं‌‌त्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता धुसरच आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बुडण्यापूर्वी त्यांनी केले फेसबूक लाइव्ह

News Desk

मी प्रखर राष्ट्रवादी आणि राष्ट्रभक्तच!; राणेंच्या आरोपला राऊतांचे प्रत्युत्तर

Aprna

माझ्यावरच्या ‘त्या’ जीवघेण्या हल्ल्याच्या कटात जयंत पाटील सामील! – गोपीचंद पडळकर

News Desk
क्राइम

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या पोलिसाला बेड्या

News Desk

अकोला : शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तब्बल वर्षभर बलात्कार करणाऱ्या पोलिसावर जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्यासंदीप आनंद गवई या ४२ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यानेसंबंधित १५ वर्षीय मुलीवर ऑक्टोबर २०१६ ते जुलै २०१७ या कालावधीत बलात्कार केले. रविवारी पीडितेने याची तक्रार जुने शहर पोलीस ठाण्यात केल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली.

संदीप गवई याने २०१६ च्या दसऱ्याच्या दिवशीतिला घरी बोलावले व मोबाइल नंबर दिला. ‘मला नेहमी फोन करीत राहा. तू फोन केला नाहीस, तर तुझ्या आईला व भावाला मारून टाकीन,’ अशी धमकीही दिली. तेव्हापासून तो सतत बोलत असे. दिवाळीनंतर आई मामाच्या घरी गेल्यानंतर त्याने घरी कुणी नसल्याचे पाहूनतिला बोलावले व बलात्कार केला. त्यानंतर जानेवारी महिन्यात पुन्हा त्याने बलात्कार केला. मी शाळेत जायचे,तेव्हा आरोपी पाठलाग करायचा व जवळीक करण्याचा प्रयत्न करायचा; मात्र त्याला सतत टाळण्याचा प्रयत्न करायचे, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, ४ जुलैच्या रात्री आरोपीने आई घरी असताना हाका मारल्या. आईने विचारणा केली असता, मी आजपर्यंतचा घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर आम्ही पोलीस ठाणे गाठले असेही पीडितेने म्हटले आहे.

Related posts

पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांशी सौजन्याने वागावे – पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज

News Desk

अडीच वर्षाच्या चिमुकलीच्या हत्येप्रकरणी अलीगड पोलिसांनी ४ जणांना केली अटक

News Desk

आत्महत्ये ऐवजी आईची हत्या

News Desk