HW News Marathi
महाराष्ट्र

जगातलं पहिलं वृक्ष संमेलन झालेल्या, बीडमधील सह्याद्री देवराईला भीषण आग

बीड | अभिनेता सयाजी शिंदे यांच्या कल्पनेतून उभा केलेल्या बीड मधील सह्याद्री देवराईला भीषण आग लागलीय. या आगीत जवळपास 500 झाड जळून खाक झाले आहेत. तर आग लागली नसून लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अभिनेता सयाजी शिंदे यांनी गेल्या चार वर्षांपूर्वी 14 फेब्रुवारी या दिवशी, बीड पासून काही अंतरावर सह्याद्री देवराईची जोपासना केली होती.

आज हे सह्याद्री देवराई एक पर्यटन केंद्र बनत चालले आहे.  सह्याद्री देवराई येथे काल (१२ फेब्रुवारी) आणि आज (१३ फेब्रुवारी) या दिवशी या ठिकाणी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील जमते. कारण जगातलं पहिलं वृक्ष संमेलन याच सह्याद्री देवराईमध्ये झालं होतं. वडाच्या झाडाला या कार्यक्रमाचे अध्यक्षपद अभिनेता सयाजी शिंदे यांनी दिलं होत. त्यामुळे ही सह्याद्री देवराई राज्यात चर्चेत आली होती. मात्र आता या सह्याद्री देवराई ला आग लागल्याने जवळपास दोन एकरचा परिसर जळाला असून यामुळे पाचशेच्या आसपास वड, लिंबू, पिंपळ आदी झाड जळून खाक झाले आहेत. दरम्यान या झाडाविषयी सह्याद्री देवराईसाठी काम करणाऱ्या, सामाजिक कार्यकर्त्यांसह वृक्ष प्रेमींनी संवेदना व्यक्त करत, ज्याने कोणी हे केला आहे. त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान बीड जिल्हा पडत असणारा सततचा दुष्काळ, कुठे तरी दूर व्हावा आणि जिल्ह्यात पर्यटन केंद्र बनावे. या उद्देशाने अभिनेता सयाजी शिंदे यांनी ही सह्याद्री देवराई ची स्थापना केली होती. मात्र काही विकृतीच्या लोकांकडून कुठंतरी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसत आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार

News Desk

आज होणार माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्या राजकीय भविष्याचा फैसला

News Desk

उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल; शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन साधला संवाद

Aprna