पंढरपूर | राज्यात पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक चांगलीच गाजली. भाजप आणि राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची ठरली होती. दरम्यान, या निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा धक्का देत भाजपने सरशी मारली. भाजप उमेदवार समाधान आवताडे यांचा विजय झाल्यानंतर भाजपची ताकद लक्षात आलीच पण राष्ट्रवादीसाठी हा मोठा इशारा ठरला. दरम्यान, आपल्या या विजयानंतर आज (९ मे) समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारक यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर लागलेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी आपली ताकद पणाला लावली होती. राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सर्वांनीच ह्या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला. राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचेच पुत्र भगीरथ भालके तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली होती.
अखेर पंढरपुरातील या प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपने मुसंडी मारली आणि समाधान आवताडे विजयी झाले. भाजपसाठी हा विजय अनेक अर्थांनी विशेष, मोठा मानला जातो. तर महाविकासआघाडी आणि राष्ट्रवादीचा हा पराभव म्हणजे मोठा धक्का आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.