HW News Marathi
महाराष्ट्र

संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा साबळे वाघिरे कंपनीचा निर्णय

पुणे | थोर महापुरुषांची नावे बिडीला देण्यावरून अनेकांनी विरोध केला होता. आता संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय साबळे वाघिरे कंपनीने घेतला आहे. संभाजी बिडीचे नाव बदलावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून संभाजी ब्रिगेड आणि काही राजकीय संघटनांनी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला आंदोलन सुरु केले होते. त्यांच्या या आंदोलनाला यश आले असून, संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय साबळे वाघिरे आणि कंपनीने घेतला आहे. कंपनीने प्रसिद्धिपत्रक काढून याबाबतची माहिती दिली. शिवधर्म फाऊंडेशन आणि इतर शिवप्रेमी संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जनभावनेचा आदर करुन आम्ही विडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे साबळे वाघेरे आणि कंपनीचे संचालक संजय वाघिरे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले.

 

 

छत्रपती संभाजी महाराजांचं नाव अशा पद्धतीने वापरले जाऊ नये, यासाठी संभाजी ब्रिगेडने अनेक वर्षापासून हा विषय लावून धरला होता. कंपनी आपल्या उत्पादनासाठी नवीन नाव कायदेशीर प्रक्रियेने नोंदवणार आहे. म्हणजेच संभाजी बिडीऐवजी नवं नाव रजिस्टर केलं जाईल. जेणेकरुन हे नवीन नाव ग्राहकांपर्यंत पोहोचवता येईल, असं कंपनीचं म्हणणं आहे. दरम्यान, नितेश राणे, रोहित पवार, अमोल कोल्हे यांच्यासह अनेकांनी नाव बदलावे यासाठी मागणसंदर्भात केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माहिती आणि प्रसारण खाते मिळालेल्या प्रकाश जावडेकरांबद्दल या गोष्टी जाणून घ्या

News Desk

चक्रीवादळामुळे झालेली नुकसाभरपाई द्यावी – फडणवीस

News Desk

आम्ही पोपट-बीपट पाळत नाही…ते काम शिवसेनेचंच !, चंद्रकांत पाटलांची टीका

News Desk