HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे घेणार राष्ट्रपतींची भेट!

मुंबई। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे भेटीची वेळ मागितील होती. राष्ट्रपतींनी खासदार संभाजीराजेंना गुरुवार २ सप्टेंबरची भेटीची वेळ दिली होती आणि आज राज्यातील सर्वपक्षीय एक खासदार प्रतिनिधींसोबत राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. राष्ट्रपतींची भेटीची वेळ मिळाली असून आज भेटणार असल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली होती. मराठा समाजाचे प्रश्न आणि समाजाच्या भावना राष्ट्रपतींसमोर मांडण्यासाठी संभाजीराजेंनी वेळ घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजेंनी आक्रमक भूमिका घेतली असून मराठा समाजाच्या प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न संभाजीराजे करत आहेत.

प्रमुख ४ पक्षातील खासदार प्रतिनिधींना सोबत येण्याचे आवाहन

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी राज्यातील प्रमुख ४ पक्षातील खासदार प्रतिनिधींना सोबत येण्याचे आवाहन केलं आहे. यामध्ये शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, काँग्रेसकडून प्रतिनिधी म्हणून संग्राम थोपटे तर भाजपकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित राहणार आहे. हे शिष्टमंडळ खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत.

संभाजीराजेंनी राज्यभरात मूक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संभाजीराजेंनी राज्यभरात मूक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि राज्य सरकारने मागण्या पुर्ण करण्याबाबत ग्वाही दिल्यामुळे आंदोलनं स्थगित करण्यात आली आहेत. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आणि मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सोबत येऊन प्रयत्न करावा अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या जागी विक्रम कुमार नवे पालिका आयुक्त

News Desk

शेतकरी आत्महत्ये प्रकरणी करमाळा बंद, मुख्यमंत्री आल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही

News Desk

‘दुल्हन हम ले जायेंगे’ म्हणत IT विभागाने काढली वरात; जालन्यात कोट्यवधींचं घबाड जप्त

Manasi Devkar