HW News Marathi
महाराष्ट्र

“मी ओबीसी समाजाला दुखावून काहीच करणार नाही”, संभाजीराजेंची ग्वाही

बीड | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळल्यामुळे अनेक वादविवाद सुरु आहेत. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुद्धा आता एका वेगळ्याच वळणावर गेला आहे. ओबीसी आरक्षणाबद्दल अनेक नेत्यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. या प्रकरणात आता खासदार संभाजी छत्रपती यांनी आपलं मत मांडलं आहे. ते म्हणाले, कि, ओबीसी समाजाला दुखवून मी काहीच करणार नाही’.

ओबीसी समाजाला दुखावून मी कोणतेही काम करू शकत नाही

खासदार संभाजी छत्रपती सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज (३ जुलै) पत्रकार परिषदेमध्ये, ‘ओबीसी समाजाला दुखावून मी कोणतेही काम करू शकत नाही. जातीविषमता दूर करण्यासाठी माझा हा लढा आहे. कुठल्याही पक्षाच्या विरोधात माझा लढा नाही, अशी ग्वाही देतानाच लोकप्रतिनिधींनी आता मराठा समाजाला वेठीस धरू नये. सगळ्या पुढाऱ्यांनी कायद्याचा अभ्यास करून आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र यावे’, असे आवाहन खासदार संभाजी छत्रपती यांनी केले आहे.

मी राजीनामा दिला तर मार्ग निघणार का?

मराठा आरक्षणासाठी मी राजीनामा दिला तर मार्ग निघणार का? निघत असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, संभाजी छत्रपतींनी हे विधान केलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मी भेट घेतली. ते मराठा आरक्षणा संदर्भात सकारात्मक आहेत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या लढ्यात मी पाठीशी आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षण संदर्भात माझा अभ्यास सुरू आहे. मात्र बहुजनांच्या प्रश्नासंदर्भात सदैव त्यांच्या पाठीशी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मला मुख्यमंत्री करा मग प्रश्न विचारा

खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले हे काल बीड येथे जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आले असता त्यांनी जनतेशी संवाद साधत म्हणाले की मला मुख्यमंत्री करा मग मी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो. या वक्तव्याने संबंध महाराष्ट्रात चर्चेला उधाण पेटले असून छत्रपती संभाजीराजे भोसले यांनाच मुख्यमंत्री होण्याची इच्छा तर जागी झाली नाही ना? असा सवाल जनसामान्यांच्या उपस्थित होत असतांना आज बीड येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधतांना काल केलेल्या वक्तव्याचा संभाजीराजे यांनी खुलासा केला, ते म्हणाले ‘संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना समजावण्यासाठी मी सहज म्हणालो, जर मी मुख्यमंत्री झालो तर मराठा आरक्षणाचा प्रश्न मला विचारा असे म्हणून मी कार्यकर्त्यांची समजूत काढली.असे स्पष्टीकरण पत्रकारांशी बोलतांना केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टिपू सुलतानच्या नामकरणावरून भाजप अन् बजरंग दलाचे मुंबईत तीव्र आंदोलन

Aprna

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतला महाराष्ट्रातील कोरोना स्थितीचा आढावा

News Desk

राज्य सरकार आणि समता परिषदेच्या विधिज्ञांचा सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद

Aprna