HW News Marathi
महाराष्ट्र

मला कुणी शिकवण्याची गरज नाही, फडणवीस बोलले तरच उत्तर देईन!

अहमदनगर | खासदार संभाजी छत्रपती आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद काही थांबताना दिसत नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजेंनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे. मला कुणी शिकवण्याची गरज नाही. देवेंद्र फडणवीसांनी जर मला सल्ला दिला तर बोलेल. आता बोलणार नाही, अशा शब्दांत संभाजीराजेंनी चंद्रकांतदादांना सुनावलं आहे.

खासदार संभाजी छत्रपती आज (१२ जून) कोपर्डीत आले होते. यावेळी त्यांनी पीडिताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यावेळी त्यांना 16 जूनच्या मोर्चाविषयी विचारण्यात आलं. तसेच चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेवरही विचारण्यात आलं. त्यावर मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांचा वंशज आहे. त्यामुळे मी लोकांना वेठीस धरू शकत नाही. 2007 पासून मी मराठा आंदोलनात आहे. हे केव्हा आले हेच मला कळत नाही. जरा त्यांना विचारा, असं सांगतानाच मला कुणी शिकवण्याची गरज नाही. मला देवेंद्र फडणवीस सल्ला देत असतीर तर मी त्यावर बोलेन, असं संभाजीराजे म्हणाले.

मी राष्ट्रपती नियुक्त खासदार – संभाजीराजे

आम्ही संभाजीराजेंना भाजपचे मानतो, ते स्वत:ला भाजपचे मानतात की नाही माहीत नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्याचाही त्यांनी समाचार घेतला. गेल्या दोन तीन दिवसांपासून त्यांना संभाजीराजेच दिसत आहेत. आपण रोज सकाळी उठल्यावर देवाचा मंत्र म्हणतो. ते संभाजीराजेंचा मंत्र म्हणत आहेत. आमच्यात का दुरावा आहे हे त्यांनाच विचारा. मी काही ज्योतिषी नाही. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी ज्योतिषाला कधीही मानलं नाही, असं सांगतनाच मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्व क्षेत्रांच्या समृद्धीसाठी विकासाच्या रोडमॅपद्वारे कामे सुरू! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

मुंबईतील अतिवृष्टीसाठी फक्त शिवसेनेवर टीका, सामनातून उद्धव ठाकरेंचा सवाल

News Desk

कोरोना वाढतोय, मास्क वापरा! – मुख्यमंत्री

Aprna