HW News Marathi
महाराष्ट्र

मी समाजाचा नेता नाही, तर सेवक आहे- संभाजीराजे 

मुंबई | मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज (७ ऑक्टोबर) नवी मुंबईत मराठा आरक्षणाची महत्वाची बैठक छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी संभाजीराजेंनी, मी मराठा समाजाचा सेवक आहे म्हणून माझी ही खुर्ची समाजाच्या बरोबर पाहिजे असे विधान केले. ते मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत बोलत होते. या बैठकीत अनेक महत्वाच्या गोष्टींवर चर्चा झाली. वाशीच्या माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या पुढाकाराने माथाडी भवन येथे ही बैठक पार पडली. यावेळी संभाजीराजे आणि उदयनराजे उपस्थित राहणार होते. मात्अर, ऐनवेळी आज उदयनराजे यांनी या बैठकीला पाठ फिरवली आणि ते अनुपस्थित होते.

‘मी समाजाचा नेता नाही, तर सेवक आहे’ अशी माझी प्रामाणिक भावना आहे. त्यामुळे मी समाजाचा घटक म्हणून समाजाच्या सोबतच बसेन, अशी भूमिका घेऊन बैठकीत सहभागी झालो आहे.राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारी ११ ऑक्टोबर २०२० ला आयोजित केलेली एमपीएससीची परीक्षा ही पुढे ढकलण्यात यावी तसेच जोपर्यत मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत कोणतेही ठोस निर्णय होत नाही तोपर्यत राज्य शासनामार्फत पोलीस किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या शासकीय भरती घेऊ नये त्या पुढे ढकलण्यात यावी यावर चर्चा झाली.

एससीबीसीच्या अंतर्गत राज्य सरकार आणि उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण जाहीर केल्याप्रमाने सप्टेंबर २०२० च्या अगोदर शिक्षणामद्ये १२ टक्के आणि नोकरीत १३ टक्के आरक्षण मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शेजारील राज्य तमिळनाडू आणि केंद्र शासनाच्या सुपर निम्रील प्रमाणे महाराष्ट्र शासनाने देखील मराठा समाजासाठी तरतूद करावी हा विषय देखील चर्चेत आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारत सरकार ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करणार, शरद पवार यांनी या निर्णयाचे केले स्वागत…

News Desk

ब्लू व्हेल गेमवर केंद्राला विचारून बंद करणार

News Desk

“ओ परबांनू, आयकतास ना! मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका”, नितेश राणेंनी डिवचले

News Desk