HW News Marathi
महाराष्ट्र

समीर वानखेडे मुस्लिमच! आता खोटं बोलताहेत; निकाह लावणाऱ्या काझी अहमदचा दावा

मुंबई। अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज, बुधवारी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या निकाहनामा ट्वीटरद्वारे जारी केला. मलिक यांनी वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा फोटो आणि सर्टिफिकेट देखील ट्वीट केले. यावर आता आता वानखेडे यांचं पहिलं लग्न (निकाह) लावणाऱ्या काझी मौलाना मुजम्मिल अहमद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समीर वानखेडे मुस्लिमच असल्याचा दावा काझी अहमद यांनी केला आहे. ते म्हणाले की, ‘समीर वानखेडे मुस्लिम आहेत. ते आता खोटं बोलत आहेत. २००६ साली मीच वानखेडेंचा निकाह लावला होता.’

काझी नक्की काय म्हणाले?

माध्यमांशी बोलताना काझी मौलाना मुजम्मिल अहमद म्हणाले की, ‘२०१६ साली वानखेडे यांचा निकाह लावला होता. वानखेडेंचा निकाहनामा खरा आहे. त्यावेळेस समीर, समीर त्यांचे वडील, पहिली पत्नी शबाना आणि तिचे वडील सर्व मुस्लिम होते. जर समीर हिंदू असते तर निकाह झाला नसता. कारण शरियतनुसार असं होऊ शकत नाही. तसंच शरियतच्या विरोधात जाऊन काझी निकाह लावू शकत नाही. समीर आज कोणही असो, त्यावेळेस समीर मुस्लिमच होता.’

समीर वानखेडे खोटं बोलत आहेत

‘अंधेरीतील लोखंडवाला कॉम्पलेक्समध्येच समीर वानखेडे यांचा निकाह झाला होता. त्यावेळेस जवळपास २ हजार लोकं उपस्थित होते. यामध्ये अनेक हाय प्रोफाईल लोकं होते. मोठ्या थाटामाटात समीर वानखेडेंचा निकाह पार पडला होता. निकाह वेळी ३३ हजार रुपये मेहर घेण्यात आला हे खरं आहे. समोर आलेल्या निकाहनामातील सर्व शब्द हे खरे आहेत. समीर वानखेडे खोटं बोलत आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव दाऊत होते,’ असे काझी अहमद म्हणाले. पण आता नक्की वानखेडे खोटं बोलत आहेत? की निकाह लावणारे काझी अहमद? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाराष्ट्र तुफां के साथ हमेशा खेला है”, चाकणकरांचे अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर

News Desk

महाराष्ट्रबंदची हाक दिली नसती तरीही महाराष्ट्र स्वयंस्फुर्तीने बंद झाला असता ”रामदास आठवले यांचे प्रत्युत्तर

News Desk

रस्ता रुंदीकरणाच्या कामास नागरिकांनी सहकार्य करावे! – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

Aprna