मुंबई | क्रूझ ड्रग्ज प्रकरणापासून राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या कुटुंबावर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. आता नवाब मलिकांनी आज (८ नोव्हेंबर) पुन्हा वानखेडेंच्या मेहुणीवर पुण्यात ड्रग्ज केसची नोंद असल्याची माहिती त्यांनी ट्वीट करून दिली आहे. तसेच हे प्रकरण पुण्यात प्रलंबित असल्याचा दावा मलिकांनी केला आहे. मलिकांच्या आरोपवर वानखेडेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हे प्रकरण जानेवारी २००८ मध्ये घडलं होतं. त्यावेळी मी सेवेतही नव्हतो आणि क्रांती रेडकरसोबत २०१७ साली विवाह झाला आहे. मग, या प्रकरणाशी कसा संबंध असू शकतो, असा सवाल वानखेडेंनी मलिकांना विचारला आहे. तसेच क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर मलिक हे दररोज वानखेडे यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडत आहेत.
Sameer Dawood Wankhede, is your sister-in-law Harshada Dinanath Redkar involved in the drug business ?
You must answer because her case is pending before the Pune court.
Here is the proof pic.twitter.com/FAiTys156F
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 8, 2021
नवाब मलिकांनी ट्वीटमध्ये नेमकं काय म्हटलं
“समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दिनानाथ रेडकर या ड्रग्जच्या व्यवसायात सहभागी आहेत का? तुम्ही या प्रश्नाचे उत्तर द्यावंच लागेल. कारण हर्षदा रेडकर यांच्याविरोधात केस पुणे कोर्टात प्रलंबित आहे.” असे ट्वीट मलिकांनी केलं आहे. तसेच ट्वीटसोबत या प्रकरणातील काही स्क्रिनशॉट्सही जोडलेले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.