HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई आणि पुणे दोन्ही शहरात ‘सन्मान मोर्चा’ला परवानगी नसताना सुद्धा मोर्चा काढला

मुंबई | भिमा-कोरेगाव दंगली प्रकरणाती मुख्य आरोपी आणि शिवप्रतिष्ठाचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ राज्यभर ‘सन्मान मोर्चा’ काढण्यात आला होता. मुंबई आणि पुण्यात या ‘सन्मान मोर्चा’ला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मुंबईत हा मोर्चा भायखळा ते आझात मैदान असा हा मोर्चा काढण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र आझात मैदानात मोर्चाला परवानगी देण्यात आली होता.

पुणे पोलिसांनी या मोर्चास परवानगी नकारल्यानंतर सुद्धा शिवप्रतिष्ठाने मोर्चा काढण्याच्या निर्णयावर ठाम होती. पहिल्यांदा शिवप्रतिष्ठानच्या वतीने हा मोर्चा शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या मार्गात बदल करुन ओंकारेश्वर मंदिराजवळील नदीपात्रातून मार्गक्रमण करणार असून लालमहालापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

सांगली शहरात मोठ्या संख्येने शिवप्रतिष्ठांच्या कार्यकर्त्यांनी ‘सन्मान मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सांगलीतील मोर्चा स्टेशन रोड चौकातून जिल्हाधिकाऱ्याना निवेदन देण्यात आले. मोर्चात शिवप्रतिष्ठानाचे कार्यकर्ते आणि हिंदूत्ववादी संघटनांनी या मोर्चात सहभागी झाले होते. मुंबई आणि पुणे दोन्ही ठिकाणी पोलिसांनी या मोर्चाला कडेकोट बंदोबस्त केला होता.

भिमा-कोरेगाव दंगली प्रकरणातील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी म्हणून भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आझाद मैदानात ‘एल्गार मोर्चा’ काढण्यात आला होता. सरकारने जर आठ दिवसात संभाजी भिडे यांना अटक नाही केली तर विधानभवनाला घेराव घालू असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी या मोर्चात दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नायगाव येथे विज पडून दोघांचा मृत्यू तर दोनजण जखमी

News Desk

सीकेपी बँकेचा RBI ने केला परवाना रद्द

News Desk

जोरदार पावसामुळे खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Aprna