HW News Marathi
क्राइम

“होय मी भंगारवाल्याची मुलगी”-सना मलिक

मुंबई | होय मी भंगारवाला आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आपल्यावर दाखल १०० कोटींच्या खटल्यावर उत्तर दिलं आहे. या राज्यात निरपराध लोक बाहेर येत नाहीत, यांची सगळी प्रकरणं बोगस असल्याचं सिद्ध करत नाही तोवर चित्रपट संपणार नाही असंही ते म्हणालेत.. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपा नेते मोहित कम्बोत यांच्या १०० कोटींच्या खटल्यावर उत्तर देताना होय मी भंगारवाला आहे असं म्हटलं आहे. दरम्यान नवाब मलिक यांच्या या वक्तव्यानंतर त्यांची मुलगी सना मलिकनेही ट्वीट केलं आहे. “होय मी भंगारवाल्याची मुलगी! मला अभिमान आहे. मी मराठी मुलगी,” असं ट्वीट करत त्यांनी वडिलांना पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी #NawabMalikMyHero हा हॅशटॅगदेखील वापरला आहे.

मी कधीही मुंबईत सोन्याची तस्करी केली नाही

यावेळी त्यांनी नवाब मलिक या शहरात जेवढे भंगार आहेत, त्यांचे एकएक नट बोल्ट काढून भट्टीत टाकणार आहे आणि यांचं पाणी केल्याशिवाय थांबणार नाही असा इशाराही दिला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.“माझ्या आजोबांनी कधीही बनारसमध्ये कोणत्या डाकूंकडून सोनं घेतलेलं नाही. माझ्या वडिलानी चोरांकडन सोनं खरेदी केलं नाही. मी कधीही मुंबईत सोन्याची तस्करी केली नाही. मी कोणतं मार्केट बुडवलं नाही. कोणत्याही बँकांचे पैसे खाल्ले नाहीत. मी कंपन्या निर्माण करुन बँकांचे शेकडो कोटी बुडवले नाहीत. माझ्या घरी कधी सीबीआयीने धाड टाकलेली नाही. माझ्यावर कोणताही आरोप नाही. मुख्यमंत्री निधीत तो चेक बाऊन्स मी केला नाही,” असा टोला यावेळी नवाब मलिक यांनी लगावला.

भाजपा नेता मोहित कम्बोत यांच्याकडून १०० कोटींचा खटला दाखल करण्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “माझी तर औकात इतकी नाही. माझा ब्रॅण्ड त्यांनी १०० कोटींचा केला आहे. सगळं विकलं तरी माझ्याकडे १०० कोटी नाहीत. ते सांगतात भंगारवाले…पण भंगारवाला काय असतो. होय मी भंगारवाला आहे. माझे वडील कपडे आणि भंगारचा व्यवसाय केला. वयाच्या १६ व्या वर्षापासून ते राजकारणात आमदार होण्यापर्यंत मी भंगारचा व्यवसाय करत होतो. शेजारीच आमचं दुकान आहे, जाताना त्याचे फोटोही काढा. माझे कुटुंब भंगारचा व्यवसाय करतं याचा अभिमान आहे”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बनावट स्टँम्प पेपर घोटाळ्यातील दोषी तेलगी व्हेंटिलेटरवर

News Desk

केईएम रुग्णालयातील फिजीओथेरपीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

News Desk

पेट्रोलपंप घोटाळ्यातील मोऱ्हक्या अखेर गजाआड

News Desk