HW News Marathi
महाराष्ट्र

“आधुनिक रँडला निवडणुकीत जनताच धडा शिकवेल”निर्बंधांवरुन संदीप देशपांडेंची मुख्यमंत्र्यावर टीका!

मुंबई। कोरोनामुळे सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या असल्या तरी दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेत दहीहंडी उत्सव साजरा केला. मनसेने आक्रमक भूमिका घेत दहीहंडी उत्सव साजरा केला. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कोणतीही गोष्ट होऊ नये म्हणून पहिली, दुसरी तिसरी लाट मुद्दाम आणली जात आहे असे म्हटले होते. त्यावर करोनाचे नियम तोडून दहीहंडी उत्सव साजरा करुन काय मोठं स्वातंत्र्य मिळवलं नाही असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली आहे.

आत्ताच्या आधुनिक रँडला येण्याऱ्या निवडणुकीत जनता धडा शिकवेल

उद्धव ठाकरे यांनी दहीहंडी उत्सवावर भाष्य केल्यानंतर संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांची तुलना ब्रिटीश अधिकारी रँडशी केली आहे. “प्लेग ची साथ आहे या नावावर १८९७ साली रँडने जनतेवर भयानक अत्याचार केले. त्यावेळी चाफेकर बंधूनी त्याला धडा शिकवला होता. आत्ताच्या आधुनिक रँडला येण्याऱ्या निवडणुकीत जनता धडा शिकवेल हे निश्चित, असे संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य!

“काही जणांनी दहीहंडी केली. हे काय स्वातंत्र्य युद्ध नाही आहे. करोनाचे नियम तोडून आम्ही करुन दाखवलं हे काय मोठं स्वातंत्र्य नाही मिळवलं. त्याच्यासाठी आंदोलन केलं असतं तर भाग वेगळा. हा काही सरकारी कार्यक्रम नाही की फुकट करोना वाटप. याला विरोध करायला हा सरकारी कार्यक्रम नाही आहे. जगामध्ये आज ज्या काही गोष्टी मानल्या गेल्या आहेत की मास्क घालणे, हात धुणे, अंतर ठेवणे या पाळल्या नाहीत तर तिसरी लाट येऊ शकते. केंद्राने दिलेल्या पत्रात हे नमूद केलं आहे.”“हिंदू विरोधी सरकार आहे जे म्हणतात ना त्यांना मला ते केंद्राचं पत्र दाखवायचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, दहीहंडी आणि गणेशोस्तव या काळामध्ये दक्षता पाळा. सरकार कोणत्या सणाविरुद्ध नाही तर आपण करोनाविरुद्ध आहोत. म्हणून मी नेहमी सांगतो आंदोलन ज्यांना करण्याची खुमखुमी आहे त्यांनी करोनाविरुद्ध आंदोलन करा,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘…तर अधिवेशन बोलवा, मुख्यमंत्र्यांचं जशास तसं उत्तर’, मोदी-शाहांकडे बोट!

News Desk

विधानसभा पुढच्या वर्षी घ्या, राज ठाकरेंची मागणी !

Arati More

कोरोनावर लस शोधून शास्त्रज्ञांनी देशवासियांना जीवनदान दिले, केंद्रीय अर्थसंकल्पाने जनतेला मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवले – अजित पवार

News Desk