HW News Marathi
महाराष्ट्र

“स्मारक की मातोश्री ३?”  बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावरुन मनसेचा शिवसेनेला सवाल

मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ८ वा स्मृतीदिन आहे. कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी करू नका, संयम पाळा, जेथे आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्याव्यात, असं आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील जागा घेण्यात आली आहे. परंतु अद्याप त्या ठिकाणी स्मारक उभारण्यात आलं नाही. यावरून आता मनसेनं सरकारवर टीका केली आहे. “स्मारक की मातोश्री ३?” असा खोचक सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.

“महापौर बंगला घेऊन आता तीन वर्ष होत आली. परंतू हा बंगला अजूनही बंदीस्तच आहे. २३ जानेवारी आलं किंवा १७ नोव्हेंबर आलं तर निविदा काढल्यात, काम सुरू आहे इतक्याच बातम्या आम्हाला पाहायला मिळतात. खरोखर ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक असेल तर ते बंदीस्त का आहे. ते जनेसाठी का खुलं नाही? जनतेला त्या ठिकाणी का जाता येत नाही?, कोणाची खासगी मालमत्ता असल्यासारखं ते का वापरलं जातंय?,” असे सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना तत्काळ मदत द्या; दत्तात्रय भरणेंच्या सूचना

Aprna

पुणे महापालिकेचा पाणीकपातीचा निर्णय

Gauri Tilekar

मुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश, राज्यात रेमडीसीव्हीरचा पुरवठा वाढला, मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे आभार

News Desk