HW News Marathi
महाराष्ट्र

“बाळासाहेबांचे विचार राजसाहेबच पुढे नेतायत बाकी भूमिपूजन कोण करतंय ते महत्वाचं नाही”, मनसेचा टोला

मुंबई | शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं आज भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजनाचं अनेक दिग्गज नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे मनसेचा संताप उडाला असून मनसेने शिवसेनेवर टीकाही केली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करतन शिवसेनेवर शरसंधान साधलं आहे. बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम हे राजसाहेबच करत आहेत, हीच मराठी माणसाची भावना आहे. आणि तिच महत्वाची. बाकी भूमिपूजन कोण करतंय महत्वाचं नाही, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही या भूमिपूजन सोहळ्याला विरोधकांना न बोलावल्याने नाराजी व्यक्त केली आहे. विरोधकांना भूमिपूजन सोहळ्याला बोलवायला हवं होतं. बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी सर्व पक्षीय नेत्यांना बोलावण्यात आलं होतं. या प्रसंगीही सरकारने तसं करायला हवं होतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या स्मारकासाठी प्रचंड प्रयत्न केले होते. त्यांनी लागणाऱ्या परवानग्या मिळवून दिल्या होत्या. त्यांना बोलवायला हवे होते. तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी व्यक्त केली.

नितेश राणेंनीही केली टीका

नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “आज मा. बाळासाहेब असते तर, पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते. मा. बाळासाहेब मनाचा राजा माणूस! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं. त्यांच्यानंतर फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत!”.दरम्यान यावेळी त्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही आमंत्रण न देण्यावरुन आश्चर्य व्यक्त केलं आहे. “नगरविकास मंत्री एकनाथ यांनाही निमंत्रण कसं नाही? प्रोटोकॉल? आश्चर्य”.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रिया चक्रवर्तीचा हायकोर्टाकडून जामीन मंजूर!

News Desk

HW Exclusive : मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणी मला अडकवण्यात मुख्यमंत्र्यांचा हात, दरेकरांचा आरोप

Aprna

रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत सामील झाल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांवर नितेश राणेंची टीका

Aprna