HW News Marathi
महाराष्ट्र

नगरसेवक चोरुन सर्जिकल स्ट्राईकची फुशारकी मारणारे, राष्ट्रवादीकडे भीक मागतायत

मुंबई | राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या कुरबुरी सुरू आहेत. यावरून विरोधी पक्षांकडून टीका सुरू झाल्या आहेत. अशातच मनसेचे सरचिटणीस आणि माजी नगसेवक संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर जबरदस्त टीका केली आहे. राष्ट्रवादीने अहमदनगरमध्ये शिवसेनेचे ५ नगरसेवक फोडले. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. पारनेरमधील या राजकीय घडामोडीचे धक्के मुंबईपर्यंत पोहोचले.

यानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बारामतीला फोन करत आपले नगरसेवक परत पाठवा, असा निरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे. यावरून ३ वर्षांपूर्वी शिवसेनेने मुंबईत मनसेचे ६ नगरसेवक फोडले होते. त्याचा दाखला देत संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे.

“रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरुन सर्जिकल स्ट्राईकची फुशारकी मारणारे आज दिवसा उजेडी राष्ट्रवादी काँग्रेसकडे भीक मागत आहेत. कालाय तसमें नमः”, अशा शब्दांत देशपांडे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गडकरींच्या गावात भाजपचा पराभव ही आगामी पराभवाची नांदी !

swarit

‘मोदी है तो मुमकीन है’ हा भाजपचा विश्वास लोकशाहीसाठी चिंता वाढवणारा! सचिन सावंत

News Desk

भाजपविरोधातील प्रत्येक आवाज दाबण्यासाठी ED सारख्या यंत्रणांचा गैरवापर! – नाना पटोले

Aprna