HW News Marathi
महाराष्ट्र

सांगलीतील अपघाताने सम्पूर्ण महाराष्ट्र हळहळला; ६ पैलवानांचा मृत्यू

सांगली – कडेगाव येथील वांगीमध्ये ट्रॅक्टर आणि क्रुझर जीप या दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात ६ पैलवानांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडल्याची माहिती मिळली आहे.

या जीपमधून एकूण ११ जण प्रवास करत होते. हे पैलवान साताऱ्यातील औंध येथे कुस्ती स्पर्धा खेळून घरी परतताना ही घटना घडली. यात आकाश देसाई, विजय पाटील, सौरभ माने आणि शुभम घारगे असे मृत पैलवानांची नावे आहेत.

या अपघातात क्रुझर जीपचा चक्काचूर झालेले दिसून येत आहे. पैलवानांना घेऊन जाणारी जीप भरधाव वेगाने समोरच्या ट्रॅक्टरवर जाऊन आदळल्याने या अपघातातची तीव्रता मोठी असल्याचे सांगितले जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आघाडीचे भवितव्य जनतेने एकदा दाखवून दिले आता बिलोलीतही दिसेल- अतुल भातखळकर

News Desk

Raj Thackeray ED Case | चौकशी झाली म्हणजे अटक होईलच असे नाही !

News Desk

कोरोनाने मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबियांना मदत देण्याबाबत राज्यांना निर्देश द्या, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

News Desk