HW News Marathi
महाराष्ट्र

कंपाऊंडरला सतत चर्चेत राहायची भूक, संजय निरुपमांचा  राऊतांना अप्रत्यक्ष टोला

मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची काल (२६ सप्टेंबर) मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेट झाली होती. राऊत-फडणवीस यांच्या या गुप्त भेटीनंतर राज्यातील राजकीय चर्चेला उधान आले आहे. संजय राऊत आणि भाजपकडून या भेटीमागील कारण स्पष्ट केले असले तरीही या भेटीची सगळीकडे जोरदारचर्चा सुरु आहे. अशात आता काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. कंपाऊंडरला सतत चर्चेत राहायची भूक लागल्याचे निरुपम यांनी म्हटले आहे.

राऊत फडणवीस यांच्या भेटीवर संजय निरुपम यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी राऊतांवर नाव न घेता टीका केली आहे. यात त्यांनी संजय राऊत यांनी कंपाऊंडर कडून औषध घेतो या केलेल्या विधानावरही टीकास्त्र सोडले आहे. “असे वाटतेय की शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइनमध्ये राहण्याची मोठी भूक लागली आहे. ही भूक नेहमी नेत्यांनाच खाते. ही दुर्भावना नसून वास्तविकता आहे,” अशी टीका केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बॉलिवूड इंडस्ट्री मुंबईबाहेर नेणे हे काय खिशातलं पाकीट मारण्याइतकं सोपं आहे का? योगींचा सवाल

News Desk

संभाजीराजेंचा भेटी-गाठींचा सपाटा सुरुच, फडणवीसांनंतर बाळासाहेब थोरातांची घेतली भेट

News Desk

महाराष्ट्रात साधूंची भगवी वस्त्र रक्ताने भिजली याचे राजकारण कोणी करू नये, सामनातून टीका

News Desk