HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

संजय राठोड यांच्या स्वागतासाठी पोहरादेवीत समर्थकांची तुफान गर्दी

वाशिम | शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर १५ दिवसांनी ते सगळ्यांसमोर आले आहेत. बाबुसिंग महाराज संजय राठोड यांनी पोहरादेवी गडावरील बाबुसिंग महाराज समाधीस्थळाच्या दर्शनानंतर बाहेर पडले आहेत. संजय राठोड पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागलं आहे. तर, जिल्हा प्रशासनानं आदेश देऊनही राठोड समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे.

दरम्यान, संजय राठोड यांच्यासोबत पोहरादेवी गडावर शिवसेनेचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. तर, संजय राठोडांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर आहेत. दरम्यान, राठोड यांच्या या शक्तीप्रदर्शनावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. पोहरादेवी येथे कोरोनाची कोणतीही काळजी न घेता शक्ति प्रदर्शन सुरू आहे. मुख्यमंत्रांच्या आदेशाचे सरळ उल्लंघन केले जाते आहे. जिल्हा प्रशासन म्हणून तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दूरध्वनीवरून जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

वनमंत्री संजय राठोड यांनी सपत्निक जगदंबा मंदिरात दर्शन घेतले आहे. जगदंबा मंदिरात दर्शन घेतल्यानंतर संजय राठोड बाहेर पडले आहेत. यावेळी समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. वनमंत्री संजय राठोड पोहरादेवी गडावर दाखल झाल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते दाखल झाले होते.कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत. कार्यकर्त्यांकडून संजय राठोडांच्या समर्थनाच्या घोषणा देण्यात येत आहेत. पोहरादेवी गडावर संजय राठोडांचे समर्थकांनी मोठी गर्दी केली असून राठोंडांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात येत आहे. राठोड गाडीतून उतरुन पायी चालत गडावर दाखल झाले आहेत.

Related posts

अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे बाबासाहेब वाकळे

News Desk

तब्बल तीन महिन्यानंतर झी मराठीच्या ‘या’ मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात

News Desk

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांसह विखे पाटलांसमोर घोषणाबाजी

News Desk