यवतमाळ | पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्ररकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचं चर्चेत आलेलं नाव होतं. त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून टीका करण्यात येत आहे. त्यात राठोड हेदखील मागील १५ दिवसांपासून माध्यमांसमोर आले नव्हते की, कोणतंही स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं नाही. त्यामुळे विरोधानी त्यांच्यावरील शंका आणखीच गडद करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ते पोहरादेवीच्या दर्शनाला कुटुंबासह येऊन देवीचं दर्शन घेतले. त्यांच्या समर्थनासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत. त्यांच्या वाढत्या गर्दीमुळे पोलिसांकडून लाठीचार्जही करण्यात आला होता.
कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत हे समर्थक पोहरादेवी मंदिर परिसरात जमलेले दिसत आहेत. आज सकाळपासून संजय राठोड यांच्या समर्थनार्थासाठी शक्तीप्रदर्शन हे समर्थक करत आहेत. या प्रकरणावर पूजा चव्हाणची चुलत आजी म्हणाली की, “संजय राठोड यांनी खोटे बोलून समाजाची दिशाभूल करू नये. पोहरादेवी गडावर आपल्या कृत्याची कबुली द्यावी”, असे आजी शांताबाई राठोड यांनी म्हटले आहे. यावर भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी टीका केली आहे. लोक अशाप्रकारे समर्थन करत असतील तर लोकशाहीसाठी घातक असल्याचे दरेकरांनी सांगितले होते.