HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपालांचं पुस्तक पुरात वाहून गेलं का पाहावं लागेल; राऊतांचा खोचक टोला

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज(२७ जुलै) तळीये गावाची पाहणी करायला गेले होते. त्यांच्या सोबत भाजपचे निलंबित आमदार आशिष शेलार पण असल्याने राजिक्य वातावरणात खलबतं सुरु झाली आहेत. शिवसेनेनेच नेते संजय राऊत यांनी आता गोष्टीवर संताप व्यक्त केला आहे. राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक चाळूनच काम करतात. या पुरात घटनेचं पुस्तक वाहून गेलं का ते मला पाहावं लागेल, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

राज्यपाल भाजप नेता पुन्हा एकदा सिद्ध

राज्यपाल भागातसिंह कोश्यारी हे आज(२७ जुलै) तळीये गावाची पाहणी करत असताना त्यांच्या सोबत भाजप नेते आशिष शेलार असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे आता राजिक्य चळवळींना उधाण येताना दिसत आहे. राज्यपाल हे भाजपचे नेते आहेत हे पुन्हा एकदा दिसून येण्याची चर्चा आता राजिक्य वर्तुळात सुरु झाली आहे. दोन दिवसांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील तळीये आणि कोकणात पूर्वपरिस्थितीची पाहणी करत आहेत, मात्र तेव्हा राज्यपाल न जात काही दिवसांनंतर पाहणी करायला गेले आहेत. भाजप नेते आशिष शेलार हे देखील त्यांच्यासोबत असल्यामूळे आता राजिक्य चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकार यांच्यातील वाद सगळ्यांनाच माहित आहे. १२ आमदारांची रखडलेली यादी असो किंवा मग हिंदुत्वाचा विषय असो. अनेक विषयांवरुन राज्यपाल आणि सरकारमध्ये वादाचे खटके उडत असतात. दरम्यान, पावसाळी अधिवेशन २ दिवसांचं ठरवल्यामुळे भाजपचे नेते राज्यपालांच्या दरबारी गेले होते. तसेच, १२ भाजपच्या ज्या आमदारांना १ वर्षासाठी निलंबित केलं त्यासाठीही भाजपने राजभवन गाठलं होते. त्यामुळे या सगळ्यात राज्यपाल हे भाजपचे आहेत मात्र त्यांनी सरकारमध्ये आणि विरोधकांमध्ये समतोल राखला पाहिजे तो राखत नाही आणि वारंवार ते भाजप या पक्षाचेच असल्याचं दाखवून देतात अशी टीका सरकारकडून केली जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुस्लिम मुलांना मेन स्ट्रीममध्ये आणलं पाहिजे”-नाना पाटेकर

News Desk

शेतकरी आंदोलनाबाबत सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटची चौकशी होणार -गृहमंत्री

News Desk

कंगणाच्या विरोधात शिवसेनेचा हुकमी एक्का- उर्मिला मातोंडकर

News Desk