HW News Marathi
महाराष्ट्र

पुरामुळे कोकणात झालेल्यांना केंद्राने तातडीने मदत करावी, राऊतांची मागणी

मुंबई | कोकणात ३ दिवसांपाऊसन पावसाने हाहाकार माजवला आहे. चिपळूण मध्ये नदीने पाण्याची पातळी ओलांडल्याने गावांमध्ये पाणी शिरून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. NDRFचे जवान तिथे पोहोचून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक नेते घटनास्थळी पोहोचून तिथला आढावा घेत आहेत. आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकार मदत करेल हा विश्वास त्यांनी दर्शवला आहे.

चिपळूणमध्ये पूरपरिस्थिती

चिपळूण शहरात काल (२२ जुलै) अतिवृष्टीमुळे झालेल्या पुराच्या पाण्याची पातळी ही जवळपास चार ते पाच फुटांनी खाली आली आहे. रात्रभर पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी पातळी वेगाने कमी होत आहे. त्यामुळे चिपळूणवासियांनी काहीसा सुटकेचा निश्वास सोडला आहे. चिपळूणमध्ये सकाळच्या वेळात रिमझिम पाऊस सुरु आहे.

चिपळूण शहरात २०२ मिमी पडलेला पाऊस, धरणातून सोडण्यात आलेले पाणी, भरतीची स्थिती अशा कारणांमुळे चिपळूणमध्ये २००५ पेक्षा भयानक स्थिती निर्माण झाली. चिपळूण परिसरात सध्या कुठेही विद्युत पुरवठा सुरु नसून पूरग्रस्तांची संपूर्ण रात्र अंधारात गेली. त्यातच मोबाईललाही नेटवर्क नसल्यामुळे संपर्क साधण्यास अनेक अडचणी येत आहेत.

महाडमध्ये दरड कोसळली

कोकणात सतत ३ दिवस जोरदार पाऊस पडत आहे. महाड मध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. महाडमधील तळई गावातील तब्बल ३० हून अधिक घरांवर दरड कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या दुर्घटनेत येथील तब्बल ७० ते ७५ नागरिक बेपत्ता असल्याची माहिती मिळते. दरम्यान, काही वर्षांपूर्वीच अशीच घटना पुणे जिल्ह्यातील माळीण गावात घडली होती. ज्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत परळीच्या सावळाराम मंदिरात ‘श्रीराम’ जन्मोत्सव

Aprna

ऑक्सिमीटर आणि डिजिटल थर्मामीटरच्या किमती झाल्या कमी

News Desk

“काहीही करा, मदत केल्याशिवाय जाऊ नका” चिपळूणच्या महिलेने फोडला मुख्यमंत्र्यांजवळ हंबरडा…!

News Desk