HW News Marathi
देश / विदेश

संजय राऊत दिल्लीत, भाजप नेत्यांची भेट घेणार?

नवी दिल्ली | शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत हे नेहमीच चर्चेत असतात. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर राऊत नेहमीच टीका करत असतात. मात्र, गुरुवारी अचानक दिल्लीला त्यांनी दिलेल्या भेटीमुळे वेगळे वळण लागले आहे. संसदेच्या स्थायी समितीची बैठक ठरलेली नसतानाही राऊत मुंबईहून दिल्लीला गेले व तेथे मुक्कामही केला. ‘तुम्ही भाजपच्या कोणत्या ज्येष्ठ नेत्याला भेटलात का?’ असे विचारल्यावर राऊत यांनी हो असं उत्तर दिलं. आता नेमकी ते कोणाला? भेटले काय चर्चा झाली? याचं गुढ मात्र कायम आहे.

राऊतांची दिल्लीत भाजप नेत्यांना भेट?

सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यातच शिवसेनेचे वरिष्ठ नेते व खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीवारीवरून अनेक वादांना सुरुवात झाली आहे. सूत्रांनी म्हटले की, ‘राऊत भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांना भेटले. महाराष्ट्राबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून लवकरच महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार असल्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेला विलंब झाला आहे, अशी चर्चा येथील राजकीय वर्तुळात आहे.’ या भेटीचा तपशील समोर आलेला नाही तरी राजकीय निरीक्षक मोदी-ठाकरे भेटीचा संबंध हा भाजपचा कल हा नव्या अटी आणि शर्तींवर शिवसेनेसोबत पुन्हा जाण्याचा आहे, असा जोडत आहेत.

फडणवीसांनी घेतली मोदी- शहांची भेट

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोनच दिवसांपूर्वी दिल्लीला आले होते. ते मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटल्याचे समजते. भेटीचा निष्कर्ष अजून गूढ आहे. संजय राऊत दिल्लीला आले; पण पडद्यामागे काय घडत आहे याबद्दल कोणी बोलण्यास तयार नाही. परंतु, या सगळ्या घडामोडींचा संबंध हा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या होऊ घातलेल्या पुनर्रचनेशी लावला गेला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मेट्रोमधून अपहरण करून तरुणीवर बलात्कार

News Desk

ममता बॅनर्जी यांना काँग्रेस अध्यक्ष बनवा !

News Desk

कुमारस्वामी सरकारला १८ जुलैला बहुमत सिद्ध करावे लागणार

News Desk