पाटणा | अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्याच्या कुटुंबाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर सुशांतचा चुलत भाऊ आणि भाजप आमदार नीरज सिंह बबलू यांनी संजय राऊतांवर मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. संजय राऊत यांनी माफी मागितली नाही, तर मानहानीचा दावा ठोकण्याची तयारी नीरज सिंह बबलू यांनी केली आहे.
“साक्षीदारांना धमकावले जात आहे. मुंबई पोलिस त्यांना संरक्षणही देत नाहीत. ज्या प्रकारे गोष्टी उलगडत आहेत, त्या पाहता साक्षीदारांना जीवे मारले जाण्याची भीती आहे. साक्षीदारांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे” असे नीरज सिंह बबलू म्हणाले.
“मुंबई पोलिस कोणत्याही प्रकारची गडबड करु नये, साक्षीदार अडचणीत येऊ नयेत, यासाठी केंद्र सरकारला विनंती करतो. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत साक्षीदारांच्या सुरक्षेबाबत आणि अन्य महत्वाच्या मुद्द्यांबाबत बोलू” असे नीरज सिंह बबलू यांनी सांगितले.
Witnesses are being threatened, and Mumbai Police is not even providing protection to them. The way things are unfolding, the witnesses might get killed. We demand that witnesses should be given police protection: Niraj Singh Babloo, BJP MLA & a relative of #SushantSinghRajput pic.twitter.com/UgBNqur8vG
— ANI (@ANI) August 18, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.