HW News Marathi
महाराष्ट्र

‘हॅास्पिटलमधूनही पवारांची राज्य आणि देशावर बारीक नजर’ संजय राऊतांनी घेतली पवारांची भेट

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली. सध्या मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात ते एडमिट आहेत. याच पार्श्वभूमिवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (२ एप्रिल) त्यांची भेट घेतली. भेटीनंतर संजय राऊत यांनी ट्विट करत शरद पवारांची तब्येत उत्तम असल्याचे सांगितले आहे. तसेच, रुग्णालयात असूनही त्यांचे राज्यात काय सुरु आहे याकडे लक्ष असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

काय आहे संजय राऊत यांचे ट्विट?

‘देशाचे ज्येष्ठ नेते,महाविकास आघाडी सरकारचे आधारवड मा. शरद पवार यांची इस्पितळात जाऊन भेट घेतली. मा.पवार साहेबांची प्रकृती उत्तम असून. लवकरच ते घरी परततील. इस्पितळातील मुक्कामातही देशाच्या व राज्याच्या घडामोडींवर त्यांची बारीक नजर आहे हे दिसले’, असे राऊत यांनी ट्विट केले आहे.

 

दरम्यान, कालही शरद पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी जे फेसबूक लाईव्ह केले होते त्यातही शरद पवार रुग्णालायत असूनही वर्तमानपत्र वाचत असल्याचं दिसून आलं होतं. तसेच, शस्त्रक्रिया झाल्याच्या काही तासांनंतरही ते वर्तमानपत्र वाचत असल्याचा फोटो त्यांन शेअर केला होता.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काल शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती उत्तम आहे, असं सांगतानाच येत्या ८ ते १० दिवसात त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली.शरद पवारांवर ३० मार्चला यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्या पित्ताशय नलिकेत खडे आढळले. त्यामुळे त्यांना पोटदुखीचा त्रास होत होता. मात्र, एन्डोस्कोपीद्वारे हे खडे काढण्यात आले आहेत. आता त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांना आराम वाटत आहे. त्यांचा पोटदुखीचा त्रासही थांबला आहे, असं टोपे यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात २२९ नवीन रुग्णांचे निदान, एकूण कोरोना बाधितांची संख्या १३६४

News Desk

निर्बंधांना झुगारून मनसेने दहीहंडी फोडली!

News Desk

शाळांच्या फीमध्ये १५ टक्के कपात!

News Desk