HW News Marathi
महाराष्ट्र

मी मुख्यमंत्री बनण्यास बिलकुल तयार नाही !

मुंबई | शरद पवार मुख्यमंत्री बनण्यास बिलकुल तयार नाही, असे म्हणत खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम लावला आहे. पवार पुढे असे देखील म्हणाले की, ४ वेळा मुख्यमंत्री झाल्यानंतर आता पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नाही. जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. त्यामुळे आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करू,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे. पवार यांनी आज (६ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यावर चर्चा केली.

तसेच भाजप-शिवसेनेला जनतेने कौल दिला आहे. शिवसेना आणि भाजपने मिळून सरकार स्थापन करावे, मत पवारांनी मांडले आहे. दरम्यान “२५ वर्षे युतीत सडले म्हणतात तरी एकत्र लढले,” असा टोला पवारांनी शिवसेनेला लगावला आहे. संजय राऊत माझ्याकडे कोणताही प्रस्ताव घेऊ आले नाही, पवारांनी त्यांच्या भेटीवर पवारांनी प्रतिक्रिया दिली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारने तातडीने मदत करावी

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी पवारांनी सरकारकडे केले आहे. तसेच पेरणीसाठी कर्ज द्यावे, विमा कंपन्यांची बैठक घेऊन सूचना द्याव्यात, अशी मागणी पवार यांनी केली आहे. मी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचा दौरा करणार आहे, ती स्थिती पाहून केंद्राकडून मदत मिळवायचा प्रयत्न करेल, विमा कंपन्या त्यांची जबाबदारी पूर्णपणे पार पाडायला तयार नाही, त्यामुळे केंद्र सरकारने विमा कंपन्यांची बैठक घ्यावी त्यांना सूचना द्याव्या असे पवारांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

द्वेष व हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या भाजप आमदाराच्या फेसबुकवर बंदी !

News Desk

कळव्यात पूर्णपणे ‘बंद’, मेडिकल वगळता कोणतेही दुकान सुरु राहणार नाही

News Desk

खासदार नवनीत राणांनीं घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट!

News Desk