HW News Marathi
महाराष्ट्र

ईडी, सीबीआयकडून बळाचा वापर करुन नमवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तसं होणार नाही – संजय राऊत

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे, असे म्हटले जात आहे. पुण्यातील भोसरी जमीन व्यवहाराप्रकरणी ही नोटीस पाठवली जाणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, एकनाथ खडसे यांनी मला अद्याप कोणतीही नोटीस दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावरुन संताप व्यक्त केला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

“आमच्या शिवसेनेच्या लोकांनाही नोटीस आल्या आहेत. जे तुमच्या विरोधात आहेत, ज्यांच्याशी तुम्ही राजकीय सामना करु शकत नाही अशा लोकांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सकडून बळाचा वापर करुन नमवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तसं होणार नाही. यासाठीच विरोधी पक्षाने एकत्र यावं आणि मजबूत संघटन उभं करावं अशी आमची भूमिका आहे,” असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात ३ हजार २७६ ग्रामपंचायती जिंकल्या – जयंत पाटील

News Desk

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणी फडणवीसांचे ‘हे’ गंभीर आरोप

News Desk

केंद्र सरकारकडून हज यात्रेसाठी देण्यात येणारे अनुदान रद्द

swarit