HW News Marathi
देश / विदेश

मुख्यमंत्र्यांचाही फोन कुणी टॅप केला तर आश्चर्य वाटणार नाही , संजय राऊत

मुंबई | पत्रकार आणि राजकारण्यांच्या फोन टॅपिंगचा मुद्दा चर्चेत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रकरणी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना याचं जाब विचारला असून या विषयी चौकशीची मागणी केली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाही फोन कुणी टॅप करत असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रातल्या आधीच्या सरकारने काही प्रमुख लोकांचे फोन टॅप केले होते. हे टॅपिंग आता परदेशी ॲपच्या माध्यमातून केले जाते. आज हा विषय संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उचलला जाईल, असं ते म्हणाले आहेत.

पत्रकारांचे फोन मोठ्या प्रमाणात टॅप

संजय राऊत यांनी अधिक माहिती देत ते म्हणाले कि, ‘ ज्या लोकांचे फोन टॅप त्यात मोठ्या संख्येने पत्रकार आहेत. पत्रकारांचे फोन टॅप करून काय करायचं होतं माहिती नाही. मुख्यमंत्र्यांचा फोन टॅप झाला का माहिती नाही.. पण महाराष्ट्रातील सरकार बनत असताना अनेक लोकांचे फोन टॅप झाले होते त्याची चौकशी सुरू आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाही फोन कोणी टॅप करत असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही, असं ते म्हणाले आहेत.

देशाच्या पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी हे काय चालू आहे हे देशाच्या जनतेला समोर येऊन सांगितले पाहिजे. संसदीय मंत्र्यांनी काल सर्व विषयांवर चर्चा करू असं म्हटलं आहे. अनेकदा सरकार बाहेर एक गोष्ट म्हणतं आणि प्रत्यक्ष चर्चेपासून पळ काढतात. पण यावेळी मागे हटायचं नाही असं सर्व विरोधकांनी ठरवलं आहे, असं ते म्हणाले आहेत.

डोकं वर करून एअरपोर्टवरचं नाव पाहावं

छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर काल (१९ जुलै) गरबा घालण्यात आला. यावर ते म्हणाले, मी तो व्हिडीओ पाहिला नाही हा कधीच आहे हे पाहावे लागेल. एअरपोर्टचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत एअरपोर्ट आहे. असा प्रकार कुणी एअरपोर्टवर करत असतील तर त्यांनी आधी डोकं वर करून एअरपोर्टवरचं नाव पाहावं.’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

swarit

भाजपमध्ये मोदींना हटवून गडकरींना पंतप्रधान करण्याची चर्चा,नाना पटोलेंचा गौप्यस्फोट !

News Desk

मोदी सरकारने काँग्रेसला संपवण्यासाठी सर्व प्रयत्न केले | सोनिया गांधी

News Desk