HW News Marathi
महाराष्ट्र

मला सुशांतच्या परिवाराने पाठवलेल्या नोटीसची कल्पना नाही, जर वाटलं काही चूक झाली असेल तर माफी मागेन – संजय राऊत

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर सामनातून संजय राऊत यांनी त्याच्या वडिलांनी २ लग्न केली म्हणून तो नाराज होता, असे वक्तव्य केले होते. त्यावरून त्याच्या चुलत भावाने संजय राऊत यांना नोटीस पाठवली आणि ४८ तासात माफी मागावी असे म्हटले आहे. यावर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे

“मला सुशांतच्या कुटुंबियांची काय मागणी आहे ते माहिती नाही. त्याच्या परिवाराने पाठवलेल्या नोटिशीची कल्पना नाही. मी संवेदनशील व्यक्ती आहे. मला जर वाटलं की आमची काही चूक झाली आहे, तर मी माफी मागेल, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुंबईत माध्यमांशी संवाद करताना ते म्हणाले की, मी माझ्या माहितीच्या आधारे बोललो आहे”.

“काय करायचंय ते आम्ही आणि त्यांचा परिवार पाहू मीडियानं काही बोलायचं काही काम नाही, असं राऊत यावेळी म्हणाले.आम्हाला खूप काम आहे. आम्हाला १०० नोटिसा येत राहतात. बाकी काही मला माहिती नाही. मला काहीच माहिती नाही. योग्य वेळ आल्य़ावर बोलू”, असे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजदंड पळवला म्हणून कामकाज थांबणार नाही ! भास्कर जाधवांचा रवी राणांवर निशाणा

Ruchita Chowdhary

शरद पवारांच्या नावे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना सुरु करण्याचा सरकारचा विचार

News Desk

सदाभाऊ खोत यांचीही नव्या पक्षाची घोषणा

News Desk