HW News Marathi
महाराष्ट्र

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं भांडवल करु नये, राऊतांनी विरोधकांना सुनावलं

मुंबई | उद्योपगती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांचा साठा असलेलं वाहन सापडल्याप्रकरणी तपास सुरु असतानाच वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीजवळ आढळून आल्याने गूढ आणखी वाढलं आहे. मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केल्याचं पोलीस सांगत असताना दुसरीकडे कुटुंबीय मात्र हा दावा फेटाळत आहेत. या दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते आज (६ मार्च) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“जर उपस्थित केलेले प्रश्न योग्य, मुद्देसूल असतील आणि त्यांच्याकडे काही माहिती असेल तर नक्कीच तपास व्हायला हवा. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला ती घटना धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. ती आत्महत्या की हत्या याबाबतही लोकांच्या मनात शंका आहे. ती शंका लवकरात लवकर दूर होणं गरजेचं आहे. त्यांच्या मृत्यूचं भांडवल करु नये. कारण ती निरपराध व्यक्त्ती आहे. त्यांचा बळी कोणत्या कारणामुळे गेला आहे? त्याला कोण जबाबदार आहे? या सगळ्या गोष्टींबाबतचं सत्य जितक्या लवकर गृहखातं समोर आणेल तितकं हे या सरकारच्या प्रतिष्ठेसाठी आणि प्रतिमेसाठी योग्य ठरेल,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“अधिवेशन सुरु असताना एका महत्वाच्या गुन्ह्यातील व्यक्ती किंवा साक्षीदाराचा मत्यू होणं हे नक्कीच धक्कादायक आहे. पण म्हणून विरोधी पक्षाने तपास पूर्ण होईपर्यंत सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं मला योग्य वाटत नाही. त्यांच्या कुटुंबाचा, पत्नीचा आक्रोश मला व्यथित करणारा आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनाही व्यथित करत असेल. त्यामुळे हे नक्की काय आहे हे बाहेर येणं गरजेचं आहे,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

“विरोधी पक्षाने केंद्रीय तपास यंत्रणेकडे तपास देण्याची जी मागणी केली आहे त्यामुळे सत्य बाहेर येईल असं नाही. मुंबईचे पोलीस सक्षम आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास एटीएसकडे दिला आहे. त्यातील सर्व अधिकारी उत्तम आहेत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.तर, सहाय्यक पोलिस आयुक्त आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असणाऱ्या सचिन वाझे यांचे नाव या प्रकरणात पुढे आले. सचिन वाझे राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या रडावर होतेच पण आता मनसेनेही त्यांना टार्गेट केले आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्टविट करत वाझेंवर आणि शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांनाही संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. सचिन वाझे यांनी २००८ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता त्यामुळे संशय निर्माण झाल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, “मला तसं वाटत नाही. मी त्याच्याविषयी फार बोलणं योग्य नाही. एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेऊन असं बोलणं मला योग्य वाटत नाही”.

काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानीच्या अँटेलिया बंगल्याजवळ २५ फेब्रुवारीला संशयित स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळल्यानं एकच खळबळ उडाली होती. मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आल्याने तपास यंत्रणा अलर्ट झाली होती. अंबानी यांच्या घरासमोर जी स्कॉर्पिओ सापडली होती, तिच्या मालकाचा मृतदेह मुंब्र्यातल्या खाडीत सापडला आहे. मनसुख हिरेन असं गाडीमालकाचं नाव आहे. गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचं त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं. क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर आज मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा गुंता आणखी वाढला आहे. मनसुख हिरेन यांचा खून केला गेला की आत्महत्या की आणखी काही कारण आहे याचा तपास अजून सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहीहंडी साजरी करणारच, आम्ही अस्वल, आमच्यावर खूप केस, संदीप देशपांडेंची आक्रमक भूमिका!

News Desk

गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार!  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

राज ठाकरेंची नाणार प्रकल्पाची भूमिका योग्यच – देवेंद्र फडणवीस

News Desk