HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या बदनामीविरुद्ध लढलो म्हणून मला तुरुंगात टाकले तरीही मी तयार…

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यात गेले अनेक दिवस सुरु असलेला वाद चिघळत चालला आहे. आरोप प्रत्यारोपांची मालिक सुरुच आहे. अशातच मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना राणावतचे कार्यालय तोडले. त्यामुळे तिने मलाही या खटल्यात टार्गेट केल्याने आश्चर्य वाटले आणि धक्काही बसला. माझ्यावर यापूर्वीही शेकडो खटले झाले आहेत. अशा खटल्यांना मी घाबरत नाही. महाराष्ट्राच्या बदनामीविरुद्ध लढलो म्हणून मला जर कुणी तुरुंगात टाकत असेल तर मी तुरुंगातही जायला तयार आहे, असा इशारा शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दिला. आहे.

”मुंबई महापालिका ही स्वायत्त संस्था आहे. कंगनाच्या कार्यालयावर कारवाई होते, हे मला माहीत नव्हतं. माहित असण्याचं कारणही नव्हतं. पण तरीही मला कंगनाने या खटल्यात पार्टी केल्याने आश्चर्य वाटलं असून धक्काही बसला आहे. मी न्यायालयाचा नेहमीच सन्मान करतो. त्यामुळे उद्या किंवा परवा या प्रकरणाबाबत मी कोर्टात माझं म्हणणं मांडणार आहे, असं सांगतानाच या प्रकाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली आहे,” असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

”कंगनाशी माझं कोणतंही वैयक्तिक भांडण नाही. मराठी माणूस म्हणून मी मराठी द्वेषाविरोधात उभा राहिलो आणि राहतो यापुढेही राहिन. महाराष्ट्र आणि मराठीच्या अस्मितेसाठी भूमिका घेणं हा जर कुणाला अपराध वाटत असेल तर हा अपराध मी वारंवार करत राहील, असं सांगतानाच मला मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी लढण्यापासून कोणीही रोखू शकत नाही,” असा इशाराही राऊतांनी दिला.

“यापूर्वीही माझ्यावर शेकडो केसेस झाल्या आहेत. अगदी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत माझ्यावरही अग्रलेखावरुन खटले दाखल झाले. प्रत्येक वेळी बाळासाहेब माझ्यामागे खंबीरपणे उभे राहिले, असं सांगतानाच महाराष्ट्राची अस्मिता, मराठीची अस्मिता आणि महाराष्ट्राच्या बदनामीविरुद्ध लढलो म्हणून कोणी जर मला तुरुंगात टाकत असेल तर तुरुंगात जायला मी तयार आहे”, असं ते म्हणाले.

“बॉलिवूडमध्ये कुणालाही प्रवेश नाकारला नाही. इथे सर्वांचेच स्वागत आहे. या महाराष्ट्राने देशाच्या सिनेसृष्टीचा पाया घातला. त्यामुळे कुणी आम्हाला अक्कल शिकवू नये, असं सुनावतानाच ज्यांना दादासाहेब फाळके यांचं नाव उच्चारता येत नाही. ते आम्हाला शिकवतात यापेक्षा मोठा विनोद नाही”, असा टोलाही राऊतांनी कंगनाला नाव न घेता लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडीच्या १६२ आमदारांचे एकजुटीचे शक्तीप्रदर्शन

News Desk

आज राज्यात ग्रामपंचायत मतदानाची रणधुमाळी!

News Desk

३-४ दिवसात मोठी बातमी देऊ , एकनाथ खडसेंचे मोठे वक्तव्य!

News Desk