HW News Marathi
महाराष्ट्र

मी कंगनाची माफी मागेन जर…संजय राऊतांनी घेतली अट!

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणावतवर ‘हरामखोर मुलगी’ म्हणून टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर अनेकांनी त्यांच्यासह टीकेची झोड उठवली होती. संजय राऊत यांनी कंगनाची माफी मागावी अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात अस्तानाच संजय राऊत यांनी एक वक्तव्य केले आहे.

“जर कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितली तर मी तिची माफी मागण्याचा विचार करेन”, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी ‘एएनआय’शी बोलताना दिली आहे. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तिच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर संजय राऊत आणि कंगना राणावत यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. तसेच,“मुंबई किंवा महाराष्ट्राबद्दल येथे राहणाऱ्या कोणत्याही मराठी माणसाबद्दल अशाप्रकारे अभद्र भाषेचा उपयोग करणाऱ्यांना महाराष्ट्राची आणि मुंबईची माफी मागावीच लागेल. ते आमच्यापैकी कुणी असेल तरीही त्याला मी माफी मागायला सांगेन”, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत कानपूर आयआयटीचा ५४ वा दीक्षांत समारंभ संपन्न, विद्यार्थ्यांना दिले ‘हे’ सल्ले

Aprna

बॉम्बे आयआयटीने तयार केले ‘SAFE ॲप ‘

swarit

नशीब १६ व्या शतकात संघ नव्हता नाहीतर शिवाजीराजांनाही संघाचे असल्याचे यांनी म्हटले असते- धनंजय मुंडे

News Desk