HW News Marathi
महाराष्ट्र

पुढील पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री !

मुंबई | मुख्यमंत्रिपदी शिवसैनिक विराजमान होणार, असा पुनरुच्चार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केला आहे. येत्या २ दिवसात अंतिम निर्णय होईल, असा दावा देखील राऊतांनी यावेळी केला आहे. पुढील पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री, असा ठाम विश्वास राऊत यांनी आज (२२ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. महाराष्ट्रला मजबूत आणि कणखर नेतृत्त्व मिळणार, असे देखील त्यांनी यावेळी म्हणाले. आता दुसऱ्या कोणी मुख्यमंत्रिपद काय तर इंद्रपद दिले तरी माघार घेणार नाही, अशी कठोर भूमिका राऊतांनी घेतली आहे.

राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्राची राजकीय कुडंली शिवसेनाच ठरविणार, असा सूचक विधान करत भाजपवर निशाणा साधाल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी शिवसैनिकांची इच्छा असल्याचे देखील त्यांनी त्यावेळी सांगितले. तसेच काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील नेत्यांना देखील वाटते की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे, असे देखील राऊत म्हणाले. पुढील ५ वर्षासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री पदासाठी तिन्ही पक्षाकडून मंजुरी मिळाली आहे.

तसेच भाजपकडून शिवसेनेला ऑफर दिल्याची माहिती वृत्तपत्रात आली असा सवाल पत्रकारांनी विचारल्यानंतर राऊत म्हणाले की, कोणत्याही पक्षाकडून ऑफर आली नाही, आता इतरचाय ऑफरची वेळ आता संपली आहे, असे सांगत भाजपच्या ऑफरचे राऊतांनी खंडन केले आहे. आज शिवसेनेच्या आमदारांची मातोश्री येथे बैठक होणार आहे. त्याच प्रामाणे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील नेत्यांची बैठक होणार असल्याचे देखील राऊतांनी सांगितले आहे. या बैठकी उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जर ती वेळ आली तर विचार करू”,मनसे सोबतच्या युतीवर फडणवीसांचं महत्त्वपूर्ण विधान..!

News Desk

ओबीसी आरक्षण अडचणीत आणि मंत्री परदेशात; पडळकरांची महाविकासआघाडी सरकारवर टीका

Aprna

काँग्रेसच्या रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर!

News Desk