HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपच्या बाटग्यांचं महामंडळ म्हणजे शिवसेनेवर सोडलेले भाडोत्री कुत्तरडेच!

मुंबई। राजकारणात विरोधी पक्ष एकमेकांवर नेहमीच टीका करत असतात. भाजप देखील युती तुटल्यापासून शिवसेनेनवर टीका करत आहे. त्याला कारणंही तसंच आहे. दृष्टीक्षेपात असलेली मुंबई महापालिका निवडणूक… भाजपचे एकापाठोपाठ एक नेते शिवसेनेवर हल्ला चढवून चर्चेत येता. पडळकर, राणे आणि आता प्रसाद लाड… ज्या त्या वेळी शिवसेना नेते टीकेला उत्तर देत असतात. पण शिवसेनेची अस्मिता असणाऱ्या सेना भवनावर हल्ला करण्याची भाषा प्रसाद लाड यांनी केली. मग मुख्यमंत्र्यांपासून राऊतांपर्यंत सगळेच जण खवळले आहेत. आजच्या सामना अग्रलेखातून भाजपच्या वादग्रस्त नेत्यांचा समाचार घेताना संजय राऊतांनी नको नको ती विशेषणं वापरलीत. बाटगे, झुरळ, कुत्री, बेवडे… काय काय सांगावं…. सरतेशेवटी भाजपच्या बाटग्यांचं महामंडळ म्हणजे शिवसेनेवर सोडलेले भाडोत्री कुत्तरडेच, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेतला आहे.

शिवसेनेवर सोडलेले भाडोत्री कुत्तरडेच

शिवसेनेवर कोणी बोट ठेवलं कि त्यांना कसं उत्तर द्यायचं हे संजय राऊतांना माहित आहे. भारतीय जनता पक्षातील बाटग्यांचे महामंडळ म्हणजे शिवसेनेवर सोडलेले भाडोत्री कुत्तरडेच! कशात काही नसताना झुरळांच्या तांड्यांसारखे आपापल्या खुराड्याच्या गच्चीवर येऊन नरडी फुगवून प्रवचने झोडणारे हे पोंगा पंडित! आजच्या भारतीय जनता पक्षाला त्यांच्या जन्माचे डोहाळे लागण्याआधी अनेक वर्षांपासून गरम रक्ताच्या पिढीवर शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणात वाघाच्या काळजाने राजकारण करीत आहे. मराठी माणसांच्या न्याय्य, आशा-आकांक्षांचा आवाज म्हणजे शिवसेना! शिवसेनेच्या विध्वंसाची जी भाषा आजचे पावटी पावन भाजपवाले बडबडत आहेत ते त्यांचे पोटाचे जुने दुखणे आहे.

शिवसैनिकांची मनगटे हेच शिवसेनेचे बळ

शिवसेना अनेक अग्निदिव्यांतून पावन होऊन पुढे गेली आहे. धंदेवाईक दलालांच्या थैल्या हे शिवसेनेचे बळ कधीच नव्हते. तर तप्त मनाच्या शिवसैनिकांची मनगटे हेच शिवसेनेचे बळ राहिले. शिवसेना ही ज्वलंत मराठी मनाची संघटना म्हणून कायम स्वबळावरच जगत आहे. आरामखुर्चीवाले तत्त्वज्ञान आणि बाटग्यांच्या गोतावळ्यातले मखरबंद राजकारण शिवसेनेने कधीच केले नाही. सत्ता हा शिवसेनेचा आत्मा कधीच नव्हता आणि बाटग्यांच्या बळावर महाराष्ट्राच्या अस्मितेच्या लढाया आम्ही कधीच लढल्या नाहीत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Hw Exclusive | जर हिंमत असेल,लढण्याची उमेद कायम ठेवली तर नक्कीच परिस्थिती बदलू शकते

Arati More

‘राजू शेट्टीच नाही तर अन्य दोघांवरही टांगती तलवार?’

News Desk

‘अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने धोका कमी’, मदत व पुनर्वसन मंत्र्यांची माहिती…!

News Desk