HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मी राज्यपालांना वाकून नमस्कार केला कारण .. राऊतांनी सांगितलं सत्य !

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनातील भेट हा आजचा चर्चेचा विषय ठरला . ही भेट का झाली यापेक्षा या  भेटीत संजय राऊतांनी राज्यपालांना वाकून नमस्कार का केला ? याविषयी अनेक तर्कवितर्क आज लावण्यात आले.  संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यपालांवर प्रचंड टीका केली होती. राऊत यांच्या या टीकेमुळे राज्यपाल चांगलेच नाराज झाले होते. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन या कटुतेला तिलांजली दिल्याचे सांगितले जातंय.

संजय राऊत यांनी या भेटीवेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना वाकून नमस्कार केला. हा फोटो सोशल मीडियावर काही मिनिटांमध्येच व्हायरल झाला. आता या फोटोबाबत संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे माझ्यापेक्षा मोठे असल्यामुळे त्यांना नमस्कार केला. आमच्या दोघांमध्ये चांगली चर्चा झाली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकासआघाडी सरकार चांगलं चालतंय, त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, असं राज्यपालांना सांगितल्याचं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

 

 

 

Related posts

मन की बातमधून मराठमोळ्या वेदांगी कुलकर्णीचे मोदींकडून कौतुक

News Desk

राज्यातील कोणत्याही विकासकामांना स्थगिती नाही। मुख्यमंत्री

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिकेत तटकरेंना उमेदवारी

News Desk