HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असतील तर राजभवनात जाऊन सांगावं लागेल, राऊतांचा पाटलांना टोला

मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होतील अशी परिस्थिती असल्याचे म्हटले आहे. त्याला आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राजभवनात जाऊन सांगावं लागेल असा टोला लगावला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेबद्दलही खुलासा केला आहे.

महारष्ट्रात मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती

दरम्यान मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती आहे असं वक्तव्य केलं. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांचं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये समन्वय नाही. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

“पैसे किंवा खर्च हा एकमेव मुद्दा नसतो तर खूप वेळ जातो, अनिश्चतता असते. आज निवडून आलेले आमदार उद्या असतील की नाही ते ठाऊक नसतं. त्यामुळे मध्यावधी निवडणुका कुणालाच नको आहेत. पण अस्थिरतेमधून मार्ग कसा काढायचा हे पण लक्षात येत नाही. मध्यावधी निवडणूक होऊ नये म्हणून सगळेच प्रयत्न करतील. पण शेवटी कुणाचीच कॉम्बिनेशन जुळली नाहीत, तर काहीही पर्याय उरणार नाही,” असे त्यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी फडणवीस भेटीवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “राजकीय चर्चा करणं गुन्हा आहे का ? जर दोन राजकीय नेते भेटत असतील तर देशाबद्दल, कृषी विधेयकं, जम्मू काश्मीर. चीन, पाकिस्तान, कोविडबद्दल चर्चा होते”. त्यामुळे आता राजकारण नक्की कोणत्या दिशेला जाते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोहित पवारांच्या ‘त्या’ ट्विटवर अमृता फडणवीस म्हणतात…

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज १ वाजता जनतेशी संवाद साधणार

News Desk

हाताला दुखापत असूनही राज ठाकरे बैठकीला आले!

News Desk