HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज १ वाजता जनतेशी संवाद साधणार

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी १ वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोनाचा धोका, मेट्रो कारशेड आणि महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून होणारे आरोप या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळत आहे. एकीकडे कोरोनाचा धोका वाढत असताना दुसरीकडे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतं आहे. अशात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात पेटून उठले आहेत. त्यामुळे या सगळ्यावरून काही मोठा निर्णय घेतला जाणार आहे का हे पाहणं आता जनतेसाठी महत्त्वाचं असणार आहे.

खरंतर, राज्यात कोरोनाची लाट अद्यापही कायम आहे. नियम जरी शिथील केले असले तरी जीवघेण्या संसर्गाचा धोका आणखी वाढत आहे. अशात आता रेल्वे सुरू होण्यावर भर देण्यात येत असल्यामुळे भविष्यात होणारी गर्दी कशी टाळता येईल. इतकंच नाही तर कोरोनाच्या लसींसदर्भात सरकारचं काम कुठपर्यंत आलं आहे. यावरही मुख्यमंत्री महत्त्वाची माहिती देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठी घोषणा करण्याची शक्यता असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मेट्रो कारशेडवरून शह-काटशहाचं राजकारण केलं जात आहे. मेट्रोची कारशेड आरे इथं नेल्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा ते मेट्रो कारशेड कांजूरमार्ग इथं हलवण्यात आलं आहे. तोच वाद आता कोर्टापर्यंत पोहोचला आहे. त्यातच आता मेट्रो कारशेड कलिना आणि बीकेसीमध्ये हलवावं, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केल्यानं भाजपची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार? विरोधकांच्या प्रश्नांची काय उत्तरं देणार हे आज महत्त्वाचं असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुख्यमंत्र्यांनी राज्यात शरिया राजवट जारी करणे बाकी ठेवले आहे”; अतुल भातखळकरांची टीका!

News Desk

समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचे सक्षमीकरण आवश्यक! – चंद्रकांत पाटील

Aprna

राज्यातील ३६ जिल्ह्यांच्या नव्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर

News Desk