HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी!

मुंबई | गेल्या काही दिवसांमध्ये देशातसह महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होताना पाहायला मिळत आहे. सलग ३ दिवस राज्यातील रुग्णसंख्या ५० ते ५५ हजारांवर जात आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बेड्स, ऑक्सिजन यांची कमतरता जाणवत असून, कोरोना लसींचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत विरोधकांनी राजकीय फाटे फोडता कामा नये. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. शेवटी तेही महाराष्ट्राचे नेते आहेत, असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. आज ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यातील कोरोना स्थिती, लसींचा तुटवडा, बेड्स आणि ऑक्सिनजची कमतरता यांवर संजय राऊत यांनी भाष्य केले. पुढच्या काही काळासाठी राजकीय अडचणीचे प्रश्न बाजूला ठेवले पाहिजे. कोरोनाच्या स्थितीत सत्ताधारी आणि विरोधकांनी हातात हात घालून काम केले पाहिजे. सगळ्यांनीच कोरोनाविरुद्धच्या युद्धात उतरलं पाहिजे, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. तसेच, आजच्या सर्वपक्षीय बैठकीत होणाऱ्या निर्णयाला सगळ्यांनी पाठिंबा द्यायला हवा, राजकीय फाटे फोडू नका असेही म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस महोत्सवाची घोषणा केली. लोकांनी लसीकरणात सहभाग घ्यावा म्हणून त्यांनी आवाहन केले. मात्र, महाराष्ट्रात सध्याच्या घडीला लसींची तुटवडा आहे. यावरून कोणताही वाद न घालता केंद्र सरकारने महाराष्ट्राला लस कशी देता येईल, याचा विचार करावा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याला लसींचा थेट पुरवठा करणे हा राजकारणाचा भाग आहे. त्यामुळे केंद्र सरकारचीच नाचक्की होईल. केंद्राच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. राज्य सरकारचं ऐकलं जात नाही, असा संदेश जाईल, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मोदी सरकार आणि योगी सरकार बरखास्त करा” – नाना पटोले

News Desk

व्यंगचित्रातून राजकारणाची चित्रे रेखाटणारे एक राजकीय नेते

swarit

अहेरी शहरातील सुसज्ज बाजारवाडीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

News Desk