HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांना आम्ही संन्यास घेऊ देणार नाही कारण महाराष्ट्राला त्यांची गरज! – संजय राऊत

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे लढवय्ये नेते आहेत. त्यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. त्यांना संन्यासाची भाषा शोभत नाही. ते फकीर होण्याची भाषा करत असतील तर मी स्वत: त्यांची भेट घेईन, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. ते आज (२८ जून) मुंबईत माध्यमांशी बोलत होते. तीन ते चार महिन्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत करुन दिलं नाही तर राजकारणातून संन्यास घेईन असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं. संजय राऊत म्हणाले की, “देवेंद्रजींना संन्यास घेऊ देणार नाही, त्यांची महाराष्ट्र, देशाला गरज आहे. त्यांची वीरक्तीची भाषा हा महाराष्ट्रावर अन्याय होईल. चांगल्या नेतृत्त्वाचा राजकारणात तुटवडा आहे. देवेंद्र फडणवीसांसारख्या हरहुन्नरी नेत्यांना फकीर होण्याची भाषा योग्य नाही. फडणवीस लढवय्ये नेते आहेत”

मुख्यमंत्र्यांना सहकार्य करावं

देवेंद्र फडणवीस लढवय्ये आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सहकार्य करावं, संन्यास वगैरे घेण्याची भाषा करु नका, त्यासाठी मी त्यांना स्वत: भेटून त्यांना सांगेन तुमचं राजकीय भाषा उज्ज्वल आहे, असंही संजय राऊत यांनी सांगितलं. महाराष्ट्रात तीन पक्षांची महाविकास आघाडी आहे. तिन्ही पक्ष स्वतंत्र आहेत, त्यांच्या राजकीय विचारधारा वेगळ्या असल्या तरी किमान समान कार्यक्रमानुसार सरकार सुरु आहे. भांड्याला भांडं लागणारच, ते लागायलाही हवंच, तरच संसार टिकतो. भाजप-शिवसेना युती सरकारमध्येही भांड्याला भांडी लागत होती असं नाही तर भांडी फुटत होती, तरीही सरकार पाच वर्ष टिकलं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारही पाच वर्ष पूर्ण करेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

भाजपने 26 जून रोजी ओबीसी आरक्षण पूर्ववत करावं यासाठी चक्का जाम आंदोलन केलं होतं. नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडलं. यावेळी फडणवीसांनी सरकारवर तुफान हल्ला चढवला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलंय, पण आमच्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांकडून एकजण ताब्यात

News Desk

पाकिस्तानमध्ये कधी बॉम्ब फोडणार याची वाट बघतोय, मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

News Desk

शरद पवारांच्या आजारावर टीका करणाऱ्या भाजप नेत्याला शिवसेनेने फटकारलं!

News Desk