HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई मनपा शिवसेनेकडेच राहील आणि नाशिकचा पुढचा महापौरही शिवसेनेचाच होईल, राऊतांचा विश्वास  

नाशिक | राज्यात सध्या राजकीय वातावरणात अनेक महत्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहे.सध्याचं राजकीय वातावरण बदललं आहे. त्यामुळे आम्हीही नाशिकपासून कामाला सुरुवात केली आहे, असं सांगतानाच कुणी कितीही वल्गाना केल्या तरी नाशिकचा पुढचा महापौर आमचाच असेल. मुंबई महापालिकेवरही शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा विश्वास शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन हा विश्वास व्यक्त केला आहे.

नाशिकमधील बदलाविषयी आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढण्याचा आमचा विचार आहे. बाकी निवडणुका तुम्ही पाहिल्याच आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली. पहिल्यांदाच आम्ही एकत्र आलो आणि इतरांचे बालेकिल्ले ढासळले, असा खोचक टोला लगावतानाच जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. ठाकरे सरकारच्या बाजूने आहे. नाशिकमध्येही महाविकास आघाडीचा विचार केला तर शिवसेना पहिल्या नंबरवर आहे. मात्र सर्वांचा सन्मान राखूनच निवडणुका लढवल्या जाणार आहेत. कोणी कोणा बरोबर गेलं तरी मुंबई मनपा शिवसेनेकडेच राहील आणि नाशिकचा पुढचा महापौरही शिवसेनेचाच होईल, असं राऊत म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबै बँक बोगस मंजूर प्रकरणी प्रवीण दरेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Aprna

निदान महाराष्ट्राच्या चारित्र्यावर तरी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये!, राऊतांनी ठाकरे सरकारलाच सुनावले

News Desk

“कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार”

News Desk