HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्राचे नेतृत्व करण्याची संपूर्ण क्षमता सध्या कुणामध्ये असेल तर ती शरद पवारांकडे – संजय राऊत 

मुंबई | यूपीएच्या अध्यक्षपदी शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोनिया गांधी लवकर निवृत्त होतील. त्यामुळे यूपीए अध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा राजधानी दिल्लीतील राजकीय वर्तुळात आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

‘शरद पवारांना आमच्या शुभेच्छा आहेत. महाराष्ट्रातील घडामोडींचं नेतृत्व पवारांनी केलं. राष्ट्राचे नेतृत्व करण्याची संपूर्ण क्षमता सध्या कुणामध्ये असेल तर ती शरद पवार साहेबांकडे आहे. मात्र भविष्यात राष्ट्रीय राजकारणात काय होईल हे मी सांगू शकत नाही,’ असं शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

‘महाराष्ट्रामध्ये आम्ही टक्कर देतो आहोत. देशभरातील विरोधकांची इच्छा आहे महाराष्ट्रातील प्रयोग भविष्यात देशपातळीवर करता येईल का, याबाबत चर्चा आहे. महाराष्ट्रात प्रयोग झाला असल्यामुळे अनेकांना अपेक्षा आहेत,’ असं म्हणत संजय राऊत यांनी देशपातळीवर भाजपविरोधात होणाऱ्या संभाव्य आघाडीबद्दल भाष्य केलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केंद्रीय पातळीवर सुरू असलेल्या चर्चेबद्दल राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘पवार साहेब दिल्लीत गेले की अशा बातम्या येतात. साहेब मुख्यमंत्री असताना अनेक नेत्यांशी सबंध आले होते. आता शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. अजून तर माझ्या कानावर काही नाही. उद्या पवार साहेब यांचा वाढदिवस आहे तो शांततेत करण्याचा प्रयत्न आहे,’ असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांच्या यूपीए अध्यक्षपदाच्या चर्चेबाबत स्पष्ट संकेत देणं टाळलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुंबईचे डबेवाले” शक्ती आणि भक्तीचे प्रतीक! आदित्य ठाकरे

Aprna

‘राजू शेट्टी बिनबुडाचा लोटा’ शेट्टी, म्हणतात, कुणाची भाटगिरी करताय?

News Desk

‘भगीरथच’ पंढरपूर – मंगळवेढ्यासाठी भारतनानांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करणार !

News Desk